बोगस कास्ट सर्टिफिकेट सादर करणारा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ जाळ्यात

बोगस कास्ट सर्टिफिकेट सादर करणारा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ जाळ्यात

अनुसूचित जाती-जमातीच्या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे एकाने एमबीबीएसला प्रवेश घेत पदवी संपादन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आग्रीपाडा, मुंबई येथील पोलीस निरीक्षक बाळासाहेब राऊत यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी संशयित डॉ. ईसलाहुझामा सलाउद्दील अन्सारी (२८, रा. भायखळा, मुंबई) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. २०१० ते २०११ या कालावधीत संशयित डॉ. अन्सारी यांनी अनुसूचित जाती जमातीचे नसताना आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजला ‘तडवी’ या अनुसूचित जमातीचे खोटे जातप्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर केले. त्याने अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षित जागेवर एमबीबीएससाठी प्रवेश मिळवत डॉक्टरची पदवी प्राप्त केल्याचे निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षकांच्या तक्रारीची दखल घेत आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

First Published on: July 24, 2021 7:50 PM
Exit mobile version