मुलीला छेडत असल्यामुळे तरुणाची भर रस्त्यात हत्या

मुलीला छेडत असल्यामुळे तरुणाची भर रस्त्यात हत्या

Refuses to marry: Attempt to kill a young woman

बदलापूर येथील शिरगाव परिसरातील माऊली चौकात बुधवारी दुपारी भर चौकात एका युवकाची हत्या करण्यात आली. हत्या करण्यात आलेला मयत युवक हा सांगलीचा राहणारा असून त्याचे नाव सचिन शिंदे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपी कोयंडे यांच्या मुलीला सचिन अनेक दिवसांपासून त्रास देत होता. ही मुलगी विधवा असून मयत हा त्या मुलीला अनेकदा ती मुलाला शाळेत सोडायला जात असे तेव्हा पाठलाग करून शाळेजवळ येत असे. तेथे तो माझ्याशी लग्न कर अशी मागणी करायचा. मात्र हे कोयंडे यांच्या मुलीस मान्य नव्हते.

म्हणून आरोपी संतप्त झाला

मयत हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करायचा. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती. मयत तरुणास पोलिसांनी यावेळी समज सुद्धा दिल्याचे समोर येत आले होते. मात्र मयत सचिन शिंदे हा सांगली वरून तिला भेटण्यासाठी मुलाच्या शाळेजवळ येऊन उभा राहायचा, यामुळे आरोपी कोयंडे संतप्त होते.

पुढील तपास अजूनही सुरू

आज नातवाला शाळेत सोडायला जात असताना शाळेजवळ कोयंडे यांना सचिन रिक्षात बसलेला दिसला. त्यामुळे रागाच्या भरात त्यांनी स्वताबरोबर आणलेल्या चाकूने सचिनची भर चौकात रस्तावर हत्या केली. त्यानंतर त्यांनी नातवाला शाळेत सोडले आणि पोलीस स्टेशन मध्ये येऊन सचिनची हत्या केल्याचे कबूल केले. बदलापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.


हेही वाचा – दक्षिण मुंबईत होणार ‘पुल’कोंडी; नव्या वर्षात ट्रॅफिक सतावणार!


 

First Published on: January 22, 2020 8:57 PM
Exit mobile version