कापलेले मृतदेह आढळल्याने भीती

कापलेले मृतदेह आढळल्याने भीती

पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात सोमवारी सायंकाळी एक मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली असून, या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र गिड्डे तसेच वपोनि विनोद चव्हाण व त्यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. पनवेल रेल्वे स्टेशन रस्त्यावर उजव्या बाजूला सिडकोचे मोठे मैदान असून त्याठिकाणी अज्ञात व्यक्तींनी छातीपासून ते डोक्यापर्यंतचा आर्धा मृतदेह फेकून दिला होता. याबाबत परिसरातील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी ही गोष्ट तातडीने पोलिसांना कळवली. त्यानुसार पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाले आहेत.

टिटवाळानजीक रेल्वे रुळावर 15 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह                                                            टिटवाळानजीक असलेल्या बल्याणी परीसरात रविवारी रेल्वे मार्गालगत एका अनोळखी शीर व धड अलग अवस्थेतील कुजलेला मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह अंदाजे 15 वर्षीय वयोगटातील मुलाचा किंवा मुलीचा असावा असा अंदाज आहे.

बल्याणी येथील जीवन पाटील चाळलगत असलेल्या कसारा -सीएसमटी रेल्वे मार्गालगत एका अनोळखी मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाचे धड व शीर अलग झालेले असून, तो अंदाजे 15 वर्षीय वयोगटातील मुलाचा की मुलीचा असावा. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी पंचनामा करीत गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे.

First Published on: February 19, 2019 4:41 AM
Exit mobile version