त्या २८ मृत सफाई कामगारांच्या कुटुंबियांना महिन्याभरात मिळणार आर्थिक मदत

त्या २८ मृत सफाई कामगारांच्या कुटुंबियांना महिन्याभरात मिळणार आर्थिक मदत

२८ मृत सफाई कामगारांच्या कुटुंबियांना महिन्याभरात मिळणार आर्थिक मदत

गटारे आणि सांडपाण्याच्या टाक्यांची सफाई करताना मागील पाच वर्षांत महाराष्ट्रात ३० सफाई कामगारांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी फक्त दोन कामगारांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई दिलेली आहे. उरलेल्या २८ मृत सफाई कामगारांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळावी म्हणून भाजपचे आमदार भाई गिरकर यांनी लक्षवेधी सूचना विधानपरिषदेत मांडली होती. यावर उत्तर देताना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सांगितले की, या २८ कामगारांना महिन्याभरात नुकसान भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असून तसा पत्रव्यवहार पुर्ण केलेला आहे.


हेही वाचा – सारथी अनियमितता प्रकरण: अप्पर मुख्य सचिवांची समिती करणार चौकशी

तसेच हाताने मैला साफ करण्यास विरोध करणारा कायदा २०१३ साली केंद्राने मंजूर केला आहे. तरीही अद्याप अनेक ठिकाणी हाताने मैला ओढून नेला जात असल्याकडे भाई गिरकर यांनी लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना विश्वजीत कदम म्हणाले की, २०१३ च्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. तसेच मॅन्युअल स्कॅव्हेंजरचे काम करताना मृत पावलेल्या कामगाराच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. त्याचा वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. २८ मृत कामगारांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई का दिली नाही, याचा खुलासा संबंधित यंत्रणांकडून मागवण्यात आला असून एका महिन्याच्या आत ही मदत दिली जाईल.


हेही वाचा – जेजे रूग्णालयात स्वतंत्र कँसर विभाग सुरु होणार

First Published on: March 3, 2020 5:41 PM
Exit mobile version