कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाच्या स्कायवॉकला आग

कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाच्या स्कायवॉकला आग

कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाच्या स्कायवॉकला आग

हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाच्या स्कायवॉकवर आज सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास अचानक आगीने पेट घेतला. बघताबघता ही आग मोठी झाली. आगीबाबत माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी ताबोडतोब अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दल लवकर घटनास्थळी दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली. ही आग नेमकी कशामुळे लागली? हे अद्याप अस्ष्ट आहे. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगीत कितपत नुकसान झालेले आहे, याबाबत माहिती अजून मिळालेली नाही.

First Published on: September 14, 2019 11:04 AM
Exit mobile version