मन्नत बंगल्यासमोरील इमारतीला आग, एकाचा मृत्यू!

मन्नत बंगल्यासमोरील इमारतीला आग, एकाचा मृत्यू!

बॉलिवूडचा अभिनेता शाहरूख खानच्या मन्नत बंगल्यासमोरील सी स्प्रिंग इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागली. यामध्ये एका तरूणीचा मृत्यू झाला आहे आणि महिला गंभीर जखमी झाली आहे. बांद्रामधील बॅण्डस्टॅण्ड परिसरात शाहरूखचा बंगला आहे. त्या मन्नतच्या समोरच्या इमारतीत ही दुर्घटना घडली.

आज सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. इव्हाना मोरेस या २० वर्षीय तरूणीचा या आगीत मृत्यू झाला. तर सिफ्रा जाफरी ही महिला गंभीर जखमी झाली आहे. सध्या या जखमी महिलेवर भाभा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तीला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. या गटनेत जफरी ९० ते १०० टक्के भाजल्या आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. नेमकी आग कशामुळे लागली याचा शोध सुरू आहे.

First Published on: March 19, 2020 11:28 AM
Exit mobile version