केबल व्यवसायिकाची हत्या करण्यासाठी दिली पाच लाखाची सुपारी

केबल व्यवसायिकाची हत्या करण्यासाठी दिली पाच लाखाची सुपारी

गुदव्दारात हवा भरल्याने तरुणाचा मृत्यू

कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल जीवे ठार मारण्याचा प्रयत्न आणि गोळीबार प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. गोळीबाराची घटना २९ आक्टोबर २०१९ रोजी घडली होती. कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तांत्रिक तपस आणि खबऱ्याच्या माहितीच्या आधारे पोलीस पथकांनी चार आरोपीना २३ नोव्हेबर रोजी अटक केली. तर दोन्ही आरोपींना २४ नोव्हेंबर रोजी अटक केली.

अटक आरोपींची नावे अशी की, मुनवर अब्दुल सलाम शेख (वय ३२, रा. राबोडी, ठाणे), इराद युनुस कुरेशी (वय २८, रा. राबोडी, ठाणे), शैबाज गुलजार पोके (वय २४, रा. कोनगाव, भिवंडी), अफताब सैयद शेख (वय १९, रा. कोनगाव, भिवंडी), निहाद निसार करेल (वय २८, रा. कोनगाव, भिवंडी), इस्माईल रिझवान मांडेकर उर्फ बाबा (वय २९, रा. कल्याण) यांचा समावेष आहे. आरोपी मुनवर शेख आणि इराद कुरेशी यांनी तक्रारदार यांच्यावर पल्सार बाईकवरून येत पिस्टलमधून गोळीबार केला होता. तर आरोपी शैबाज पोके आणि आफताब शेख यांनी रिक्षातून आरोपीच्या हालचालींची माहिती आरोपी निशाद करेल याला पोहचवली आणि त्याने सर्व माहिती आरोपी मुनवर आणि कुरेशी याना पुरवीत पूर्व नियोजित गुन्हा घडविण्यात आला.

या गुन्ह्यात आरोपी निशाद आणि इस्माईल मांडेकर याने आर्थिक रसद आरोपींना पुरवण्याचे काम केले. अटक आरोपींच्या प्राथमिक तपासात आरोपी इस्माईल याच्या बहिणीशी तक्रारदाराचे लग्न १५ वर्षांपूर्वी झाले होते. तक्रारदार हा आरोपीच्या बहिणीला रोज मारहाण करत होता. तक्रारदार हा कमवलेला पैसा जुगारात आणि बारबालांवर उडवत होता. त्यांच्याशी अनैतिक संबंध होते. आरोपी इस्माईल याने पाच लाखाची सुपारी आरोपी निहाद करेल याला दिली होती. तक्रारदार हा केबल व्यवसायिक आहे. पोलिसांनी हत्येचा प्रयत्न आणि गोळीबाराचे रहस्य उकळले. सुपारी घेऊन तक्रादाराला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले. अटक आरोपीना न्यायालयात नेले असता त्यांना २९ नोव्हेबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले. या प्रकरणाचा अधिक तपस पोलीस करत आहेत.

First Published on: November 25, 2019 9:13 PM
Exit mobile version