शिष्यवृत्ती परीक्षेत अदिती घवाळी मुंबईतून प्रथम

शिष्यवृत्ती परीक्षेत अदिती घवाळी मुंबईतून प्रथम

शिष्यवृत्ती परीक्षेत अदिती घवाळी मुंबईतून पहिली

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परिक्षांचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे. या परीक्षेत मुंबईतून अदिती संदीप घवाळी हीने पहिला क्रमांक पटकावला. तसेच ठाणे परिसरात राहणारा श्रेयस दुर्वेने राज्यात चौथा येण्याचा मान मिळवला आहे. मात्र, या परीक्षेत विद्यार्थांचे गैरहजर राहण्याचे प्रमाण अधिकच वाढले आहे. यावर तोगडा काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.

अदिती ही विलेपार्ले येथील रहिवाशी आहे. ही विलेपार्ले येथील श्री माधवराव भागवत शाळेत शिक्षण घेत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा काही दिवसांपूर्वी पार पडली. या परिक्षेत अदितीने ९३.०५ टक्के गुण मिळवत मुंबईतून प्रथम तर राज्यातून १७वा क्रमांक पटकावला. श्रेयस हा ठाणे येथील आयईएस चंद्रकांत पाटकर शाळेचा विद्यार्थी आहे. श्रेयसने शिष्यवृत्ती परीक्षेत ९४.४० टक्के गुण मिळवत राज्यात चौथा येण्याचा मान मिळवला आहे.

राज्यातून एकूण ४ लाख ९५ हजार ५४६ विद्यार्थ्यांनी पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे. यांपैकी केवळ १ लाख ९ हजार २३० शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. चिंतेची बाब म्हणजे या परीक्षेत तब्बल १७ हजार २१७ विद्यार्थी गैरहजर होते. निकालाची एकूण टक्केवारी २२.०४ टक्के आहे.

आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या एकूण ३ लाख ४१ हजार ९९१ विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १४ हजार ८१५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. या परीक्षेला ११ हजार ३७७ विद्यार्थी गैरहजर होते. निकालाची एकूण टक्केवारी १८.४९ इतकी आहे. विद्यार्थ्यांना छापील गुणपत्रिका शाळांमार्फत १ ऑगस्टपर्यंत मिळतील, असे राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी सांगितले आहे.

मुंबईतून शिष्यवृत्ती परिक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी

इयत्ता पाचवी

पश्चिम मुंबई – अदिती घवाळी ९३.०५ टक्के
दक्षिण मुंबई – श्लोक भावे ८८.१९ टक्के
उत्तर मुंबई – साची गोगरी ८८.१९ टक्के

इयत्ता आठवी

दक्षिण मुंबई – विराज साळुंखे ९३.७० टक्के
उत्तर मुंबई – आर्या भोसले ९०.९० टक्के
पश्चिम मुंबई – सिद्धांत शेणॉय ८९.५१ टक्के

First Published on: June 20, 2019 8:36 AM
Exit mobile version