जुहू बीचवर बुडालेल्या पाच तरुणांपैकी एकाचा मृत्यू

जुहू बीचवर बुडालेल्या पाच तरुणांपैकी एकाचा मृत्यू

जुहू बीच समुद्रात बुडून चौघांचा मृत्यू

मुंबईतील जुहू बीचवर पाच तरुण बुडाले होते. हे पाचही तरुण जुहू बीचवर फिरण्यासाठी आले होते. समुद्रातील पाण्यामध्ये गेले असता पाण्यासोबत ते वाहून गेले. या घटनेत नासिर मेतर (१७) याचा मृत्यू झाला आहे तर एकाला वाचवण्यात यश मिळाले आहे.नासिरला पाण्याबाहेर काढण्यात काढून कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. हे सर्व तरुण अंधेरीच्या डी.एन नगरमध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

 

फरदीन सौदागर, सोहेल खान, फैजल शेख, नाझिर  आणि वसिम खान हे पाच तरुण जूहू बीचवर फिरायला गेले होते. समुद्रामध्ये उतरले असता हे पाचही जण बुडाले. मात्र समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या लाईफ गार्डने यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यामधील वसिम खानला वाचवण्यात यश आले आहे. तर बेपत्ता झालेल्या इतर तीन तरुणांचा शोध सुरु आहे.

 

First Published on: July 5, 2018 7:21 PM
Exit mobile version