एकाच कुटुंबातील चौघांची दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या?

एकाच कुटुंबातील चौघांची दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या?

तळोजा येथील आत्महत्येचा एक थरारक प्रकार समोर आला आहे. तळोजा येथील सेक्टर ९ मध्ये असलेल्या एका इमारतीमधील एका कुटुंबाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी घटना स्थळी धाव घेतली आहे. या घटनेत चौघांचे मृतदेह सापडले आहेत. तळोजा सेक्टर ९ मध्ये राहणारे उपाध्याय हे कुटुंब भाडे तत्वावर राहत होते. घरमालक भाडे घेण्यासाठी आले असताना हा प्रकार उघडकीस आला आहे.

यामूळे मिळाली घटनेची माहिती

सदर घटनेबाबत मिळालेल्या माहितीनूसार नितेशकुमार उपाध्याय (३५) हे आपल्या कुटुंबासमवेत आठ महिन्यापूर्वी तळोजा फेज १ मधील शिव कॉर्नर येथे राहण्यासाठी आले होते. त्यांच्या कुटुंबामध्ये पत्नी (३०) तर आठ वर्षीय मुलगी तसेच पाच वर्षाचा मुलगा असा परिवार होता. मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले हे कुटुंब असून तळोजा येथे राहायला येण्यापूर्वी दिल्लीला राहत होते. मात्र दोन महिन्यांपासून हे कुटुंब कोणाच्या संपर्कात नव्हते. घरमालक भारतद्वाज हे दोन महिन्यांपासून घरचे भाडे घेण्यासाठी फोन करीत होते. मात्र नितेशकुमार फोन उचलत नसल्याने अखेर शनिवारी भारतद्वाज तळोजा येथे त्यांच्या घरी पोहचले. मात्र दरवाजा उघडताच घरातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी बाहेर आली. काही अनुचित घटना घडली असावी असा अंदाज आल्यावर भारतद्वाज यांनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

नेमके काय घडले?

तळोजा पोलीस ठाण्यात याची माहिती मिळताच पोलीसांचे पथक घटना स्थळी हजर झाले. यावेळेस कुटुंबप्रमुख नितेशकुमारने पत्नी आणि मुलांची हत्या करून नंतर स्वतःला गळफास लावून घेतला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पनवेल शासकीय रुग्णालयात पाठविणायत आले असून पोलीस अधिक तपस करीत आहेत. हि घटना दीड ते दोन महिन्यांपूर्वी घडली असल्याचा अंदाज तळोजा येथील पोलीसांनी व्यक्त केला. या घटनेमुळे तळोजा परिसरात एकच खळबळ माजली असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातारण पसरले आहे.

First Published on: February 22, 2020 6:06 PM
Exit mobile version