बीडमधील १७ वर्षीय मुलाच्या अवयवदानामुळे चौघांना जीवदान

बीडमधील १७ वर्षीय मुलाच्या अवयवदानामुळे चौघांना जीवदान

बीडमधील १७ वर्षीय मुलाच्या अवयवदानामुळे चौघांना जीवदान

बीडमधील एका १७ वर्षाच्या मुलाचा अपघात झाला होता. तिथल्या स्थानिक डॉक्टरांनी त्याला मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्याला नवी मुंबई, वाशीतील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, त्याचा जीव वाचवणे डॉक्टरांना शक्य झाले नाही. डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित केले.

“तरुण ब्रेनडेड रुग्णाच्या कुटुंबाने अवयवदानाचा निर्णय घेतला, त्यामुळे गरजूंवर हे अवयव प्रत्यारोपित करून त्यांचा जीव वाचवण्यात यश मिळाले आहे. आपल्या मुलाच्या अवयव दानाच्या धाडसी निर्णयामुळे ४ जणांना जीवदान मिळाले आहे.”

–संदीप गुदुरू, हिरानंदानी रुग्णालयाचे फॅसिलिटी डायरेक्टर

पालकांनी दिली मान्याता

मुलाला ब्रेनडेड घोषित केल्यानंतर त्याच्या पालकांचे अवयवदानासाठी समुपदेशन करण्यात आले. आपल्या मुलामुळे कुणाला तरी जीवदान मिळेल. या आशेने त्याच्या पालकांनी अवयवदानाला परवानगी दिली. मुलाच्या कुटुंबाच्या परवानगीनुसार मुलाचे यकृत, दोन्ही किडनी, फुफ्फुस हे अवयव तसेच त्वचा आणि दोन्ही डोळेही दान करण्यात आले. त्या मुलाच्या अवयवदानामुळे ४ जणांना जीवनदान मिळाले आहे. मुंबईत हे २८ वे अवयवदान पार पडले आहे. मुंबई झेडटीसीसीच्या नियमावलीनुसार गरजूंना अवयव देण्यात आले आहेत. एक किडनी हिरानंदानी हॉस्पिटलमधील ४६ वर्षीय महिलेला देण्यात आली, तर इतर अवयवही गरजूंवर प्रत्यारोपित करण्यात आले आहेत.

First Published on: March 26, 2019 8:56 PM
Exit mobile version