महानगरच्या वृत्तानंतर बेस्टच्या फुकट्या प्रवाशांना बसणार आळा

महानगरच्या वृत्तानंतर बेस्टच्या फुकट्या प्रवाशांना बसणार आळा

बेस्ट उपक्रमाने सुरू केलेल्या वातानुकूलित मिनी बसगाड्यांमधील प्रवाशांना तिकीट देण्यासाठी पुरेशा संख्येने कंडक्टर नसल्यामुळे प्रवासी फुकट प्रवास करत असल्यासंबंधीचे वृत्त ‘दैनिक आपलं महानगर’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर बेस्ट उपक्रमाने याची दखल घेत बेस्टच्या मिनी एसी बसेसमध्ये कंडक्टरची नियुक्ती केली आहे. इतकेच नव्हेतर मध्यल्या थांब्यावर सुध्दा कंडक्टरची ड्युटी लावली आहे. त्यामुळे आता मीनी एसी बसेसमधून फुकट प्रवास करणार्‍या प्रवाशांना आळा बसणार आहे.

 बसेसमध्ये कंडक्टरची नियुक्ती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले होते. यादरम्यान बेस्टकडून अत्यावश्यक सेवेतील बसेस सुरु होत्या. मात्र, आता अ‍ॅनलॉकची सुरुवात झाल्याने बेस्टकडून दररोज ३ हजार २२४ बसगाड्या चालवल्या जात आहेत. ज्यात बेस्टच्या ६०० पेक्षा जास्त वातानुकूलित मिनी बसगाड्या धावत आहेत. या बसगाड्यांमधून विनावाहक पॉइंट टू पॉइंट सेवा दिली जाते. प्रवाशांचे तिकीट काढण्यासाठी ठराविक स्टॉपवर कंडक्टरची नेमणूक करण्यात येते. तसेच कंडक्टरची कमतरता असल्यामुळे या बसेसच्या प्रवाशांना तिकीट मिळत नाही. फक्त प्रमुख बेस्ट स्टॉपवर तिकीट काढण्यात येते. मध्येच कोणाला उतरायचे असेल तिथे वाहक नसतो. त्यामुळे प्रवासी चालकांना पैसे देतात. मात्र चालक पैसे नाकारतात, कारण नियमानुसार त्यांना तिकिटांचे पैसे घेता येत नाहीत. त्यामुळे सध्या कोरोना काळात बेस्टचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. तसेच प्रवासीसुध्दा मोठ्या प्रमाणात वातानुकूलित मिनी बसगाड्यांमधून फुकट प्रवास करत होते. यासंबंधीचे वृत्त दैनिक आपलं महानगरने प्रकाशित केले होते. त्यानंतर बेस्ट प्रशासनाने याची दखल घेत वातानुकूलित मिनी बसगाड्यांच्या मार्गांवर कंडक्टरांची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच बसेसमध्येसुध्दा कंडक्टरची नियुक्ती केली आहे. प्र्रत्येक थांब्यावर प्रवाशांची तिकीट तपासणी अभिमान सुरु केले आहे.

द. २१ ऑगस्ट २०२० रोजी दै. आपलं
महानगरमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त

होणार कारवाई

बेस्ट प्रशासनाने सांगितले की, बेस्टच्या वातानुकूलित मिनी बसगाड्यांतून आम्हालासुध्दा तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्यानुसार आम्ही आता मिनी बसगाड्यांच्या मार्गांवरील मध्यल्या थांब्यांवर एक दिवसाआड कंडक्टर ठेवणे सुरु केले आहे. कारण कंडक्टरची संख्या कमी आहे. सर्व बस थांब्यावर कंडक्टर ठेवणे शक्य नाही. त्यामुळे एक दोन दिवसांनंतर कंडक्टरची ड्युटी लावत आहे. जेणेकरुन फुकट्या प्रवाशांना आळा बसेल. इतकेच नव्हेतर काही वातानुकूलित मिनी बससेमध्येसुध्दा कंडक्टरची नियुक्ती केली आह

First Published on: September 9, 2020 6:48 PM
Exit mobile version