‘ढाण्यावाघ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होवोत’; ठाण्यात बॅनरबाजी

‘ढाण्यावाघ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होवोत’; ठाण्यात बॅनरबाजी

'ढाण्यावाघ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होवोत'

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेले राजकीय नाट्य काही केल्या संपताना दिसत नाही. निवडणूक निकालाच्या आठवडाभरानंतरही शिवसेना-भाजपचा सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला दिसत नाही. दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच सुटणे कठीण होत चालला आहे. मात्र, या सर्व घडामोडींवर आता ‘एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवोत’ अशी इच्छा मुंबई मराठी वाहतूक व्यापार सेना संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, ठाणे परिसरात याचे फलक देखील लागले आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होवोत

‘आमच्या ठाण्याचे लाडके ढाण्यावाघ एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवोत हिच आई तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना’ असे फलक ठाण्यात लागले दिसून येत आहेत.

आता फॉर्म्युला फिप्टी फिप्टीच!

लोकसभा निवडणुकीवेळी युतीसाठी करण्यात आलेल्या ५० – ५० फॉर्म्युल्यानुसारच राज्यात युतीचे सरकार स्थापन केले जाईल, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. या फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबरोबरच सरकारमधील अर्धी मंत्रिपदे आणि महामंडळांच्या वितरणाचे तत्व भाजपला अंगिकारावे लागेल. यामुळे भाजपपुढे नवे संकट उभे राहिले आहे. मात्र, अद्याप कोणताही ५० – ५० फॉर्म्युला झाला नसला तरी मात्र, ठाणे परिसरात मुख्यमंत्री होवोत अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


हेही वाचा – ‘आदित्य ठाकरेच होणार मुख्यमंत्री’


 

First Published on: November 3, 2019 12:49 PM
Exit mobile version