हॉटेलचे बिल भरताना वेटर करतात डेबिट कार्डचे क्लोनिंग

हॉटेलचे बिल भरताना वेटर करतात डेबिट कार्डचे क्लोनिंग

हॉटेलचे बिल भरताना वेटर करतात डेबिट कार्डचे क्लोनिंग

जेव्हा आपण बाहेर रेस्टॉरंटमध्ये जेवणाकरीता जातो तेव्हा पेमेंट करताना डेबिट कार्डचा वापर करतो. एखाद्या वेळेस वेटर आपले कार्ड घेऊन जातो आणि कार्ड मशीनवरून पेमेंट करून आणतो. पुढच्या वेळेस तुमच्यासह असे झाल्यास वेटरला तुमच्या टेबलवर मशीन आणण्याचा आग्रह करा. कारण नालासोपारा पोलिसांनी नुकतेच एका डेबिट कार्ड क्लोनिंग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांच्या माहिती प्रमाणे टोळ्यांनी या रॅकेटसाठी रेस्टॉरंटमधल्या वेटर्सला सामील करुन घेतले होते. वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधल्या वेटर्सची ही टोळी संपर्क साधायची आणि त्यांना ग्राहकांच्या डेबिट कार्डचा डेटा गोळा करायला सांगायची. या रॅकेटमधल्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

टोळीला कसे पकडले?

१६ डिसेंबरच्या दिवशी नालासोपारातील हनुमान मंदिर परिसरात फिरत असलेल्या दोन जणांवर पालिसांना संशय आला. पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली. दोघांनी धड काही उत्तर न दिल्यामुळे पोलिसांनी त्यांची तपासणी घ्यायचा निर्णय घेतला. त्यांच्या बॅगेतून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि डेबिट कार्ड मिळाले. त्यानंतर या दोघांनाही पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले आणि अटक केले गेले. या दोघांची नावे अनुक्रमे समीर मुमताज शेख (वय ३२) आणि जयंत उग्रसेन सिंग (वय ३०) असून त्यांच्यासह आणखी दोन श्रेयांश आणि अंकित नावाचे जोडीदार आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

कसं चालायचं हे रॅकेट?

चौकशी दरम्यान आरोपींनी सांगितले की, श्रेयांश आणि अंकित हे वेर्टसला कार्ड-रीडर मशीन द्यायचे. वेटर मग ग्राहकांचे कार्डस् घेऊन त्यावरची माहिती चोरी करून शेखला ती पाठवायचे आणि शेख ही माहिती रिकाम्या कार्डवर कॉपी करायचा. श्रेयांश आणि अंकित नंतर या कार्ड्समधील पैसे काढून घ्यायचे. पोलीसांनी सांगितल्याप्रमाणे याच गुन्ह्यावरून श्रेयांशला दिल्ली पोलीसांनी यापुर्वीच अटक केली होती. पोलिसांनी भांदवि कलम ३४ (सामान्य हेतू), ४२० (फसवणूक), ४६५ (बनावट) आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा: गाईच्या शेणाचा बाजार तेजीत, ऑनलाईन विक्री!

First Published on: December 21, 2019 11:07 PM
Exit mobile version