गांजा तस्करी करणारा बुवा गजाआड

गांजा तस्करी करणारा बुवा गजाआड

BENGALI BHONDU BABA

मुंबई:गांजा तस्करी करणार्‍या 63 वर्षीय बुवाला 2 ऑक्टोबर 2018 रोजी मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप यादव यांना मिळालेल्या माहितीनुसार या बुवाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कारवाई दरम्यान पोलिसांनी 1 लाख 10 हजार रुपयांचा 5 किलो 400 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. सध्या मुंबईमध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने प्रत्येक विभागात नशेचे पदार्थ पुरवणार्‍या दलालांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली असून, पोलिसांनी स्वतंत्रपणे या तपास चक्रात नोंदवला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील निरनिराळ्या भागात ही कारवाई सुरू आहे. अंधेरी, ग्रँट रोड,वरळी या भागात केलेल्या कारवाईनंतर आता मुंबईतील वेगवेगळ्या भागांत खबर्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करण्यात येत आहे.मालवणी येथील महाकाली कच्चा रस्ता, मार्वे मार्ग येथे गांजा घेऊन एक इसम येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त दिपील यादव यांना एका खबर्‍याने दिली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा लावून श्रीकांत लोके ऊर्फ आर. के. ऊर्फ बुवा याला ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता बुवाकडे 5 किलो 400 ग्रॅम गांजा आढळून आला. या गांजाचे मूल्य 1 लाख 10 हजार रुपये आहे. या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून श्रीकांत लोके ऊर्फ आर. के. ऊर्फ बुवा याला अटक करण्यात आली आहे. ही उत्तम कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवणी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे.

First Published on: October 4, 2018 1:36 AM
Exit mobile version