धक्कादायक; मुंबईत डान्स करताना मुलीचा मृत्यू

धक्कादायक; मुंबईत डान्स करताना मुलीचा मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

राज्यभरात सध्या सीएम चषकाचा एकीकडे जल्लोष पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे या स्पर्धेवर दु:खाचं सावट पसरवणारी धक्कादायक घटना मुंबईच्या कांदिवलीमध्ये घडली आहे. सीएम चषक स्पर्धेदरम्यान स्टेजवर डान्सचा परफॉर्मन्स करत असताना अवघ्या १२ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे स्थानिक आयोजकांना आणि समोर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनाही धक्का बसला. या प्रकारामुळे कांदिवलीमध्ये खळबळ उडाली असून या मुलीच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

नक्की घडलं काय?

कांदिवलीच्या एकता नगरमध्ये स्थानिक नगरसेवक कमलेश यादव यांनी सीएम चषक स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यामध्ये विविध स्पर्धकांचे डान्सचे परफॉर्मन्स सुरू होते. त्यातच एक अनिशा होती. अनिशा जेव्हा स्टेजवर परफॉर्मन्ससाठी चढली, तेव्हा ती नॉर्मल होती अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. मात्र, अनिशाने डान्स सुरू केल्यानंतर काही वेळातच ती अचानक खाली कोसळली. हा प्रकार पाहून आसपासच्या लोकांना काय झालंय हे काही वेळ कळलंच नाही. थोड्याच वेळात अनिशाला तिथे उपस्थित लोकांनी स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथल्या डॉक्टारांनी अनिशाला मृत घोषित केलं.

अनिशाला नक्की झालं तरी काय?

अनिशाचा मृत्यू नक्की कोणत्या कारणामुळे झाला? हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, ह्रदयविकाराच्या झटक्याने तिचं निधन झाल्याचं सांगितलं जात आहे. तसंच, अनिशाला परफॉर्मन्स करताना फिट आल्याचंही बोललं जात आहे. यासंदर्भात अनिशाचा मृतदेह कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यानंतरच तिच्या मृत्यूचं नक्की कारण समजू शकेल.


हेही वाचा – पाणी समजून अॅसिड प्यायली; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
First Published on: November 27, 2018 10:07 PM
Exit mobile version