घरदेश-विदेशपाणी समजून अॅसिड प्यायले; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू

पाणी समजून अॅसिड प्यायले; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू

Subscribe

अति घाईमुळे दिल्लीत एका तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. पाणी समजून तरुणीने अॅसिड प्यायले असून उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर – पूर्व दिल्लीच्या उस्मानपूर पोलीस ठाणा परिसरातील ब्रम्हपूरी येथे एका १९ वर्षाच्या तरुणीला अती घाई नडली आहे. घाई घाईमध्ये पाणी समजून या तरुणीने अॅसिड प्यायले. तिने अॅसिड प्यायल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले असता त्यांनी तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

अशी घडली घटना

ब्रम्हपूरीमध्ये राहणारी पुष्पा शुक्रवारी संध्याकाळी कामावरुन घरी आली. थकलेल्या पुष्पाने घाई घाईत घरामध्ये ठेवलेली पाण्याची बॉटल घेतली आणि प्यायली. मात्र त्या बॉटलमध्ये पाणी नव्हते तर त्यामध्ये अॅसिड होते. पुष्पाने जसे बॉटलला खाली ठेवले तसं तिच्या पोटात जळजळ होऊ लागली. त्यानंतर पुष्पा जोरजोरात ओरडू लागली. पुष्पाच्या घरच्यांना तिने अॅसिड प्यायल्याचे लक्षात आले. त्यांनी तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. मात्र उपचारा दरम्या तिचा मृत्यू झाला.

- Advertisement -

पोलीस तपास सुरु

पोलिसांनी पुष्पाच्या मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. त्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करणार आहेत. पुष्पा गांधीनगर येथील एका कपड्याच्या शोरुममध्ये काम करत होती. या घटनेनंतर पुष्पाच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. पोलिसांच्या तपासानंतर पुष्पाचा मृतदेह तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाईल. दरम्यान पुष्पाने पाणी समजून अॅसिड प्यायले की, जाणूनबुजून अॅसिड प्यायली याबाबत पोलीस तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -