सोन्याचे भाव गडगडले

सोन्याचे भाव गडगडले

Gold

दसर्‍यापासून वाढत चाललेले सोन्याचे भाव आता कुठे घसरायला लागले आहेत. ३२ हजारांचा टप्पा गाठल्यानंतर मंगळवारी सोन्याचे दर अचानक ११०० रुपयांनी खाली घसरले. लग्न सराईच्या तोंडावर सोन्याचे दर घटल्याने सध्या आनंदी वातावरण आहे. त्यामुळे सराफाच्या दुकानांकडे गर्दी वाढलेली दिसत आहे.

नोव्हेंबरच्या सुरुवातीला एक तोळे सोन्याचा दर 31 हजार 900 रुपये इतका होता. 5 ते 8 नोव्हेंबर या दिवाळीच्या दिवसांमध्ये सोन्याचा दर 31 हजार 695 रुपये ते 31 हजार 465 या दरम्यान होता. आज सोन्याचा दर 30 हजार 827 रुपयांवर आला आहे. गेल्या महिन्याभराचा विचार केल्यास सोन्याच्या दरात प्रति तोळा 1 हजार रुपयांची घट झाली आहे.

गेल्या महिन्याभरात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वधारले आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला. 4 नोव्हेंबर रोजी 1 डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 72.90 रुपये होते. मात्र आता रुपयाची स्थिती सुधारली आहे. आज 70.47 रुपये इतके आहे. रुपयाचे मूल्य वधारल्याने सोन्याच्या दरात घट झाली आहे.

First Published on: December 5, 2018 4:28 AM
Exit mobile version