Gold-Silver Rates Today : चांदीच्या दरात मोठी उसळी, जाणून घ्या आज सोने किती महागले ?

Gold-Silver Rates Today : चांदीच्या दरात मोठी उसळी, जाणून घ्या आज सोने किती महागले ?

आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, बुधवारच्या तुलनेत आज म्हणजेच २ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी सोने आणि चांदी महाग झाली आहे.

आज २ फेब्रुवारी २०२३ रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. सोन्याचा भाव ५८ हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या पुढे आहे. तसंच चांदीची किंमत प्रति किलो ७१ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर ९९९ शुद्धतेच्या २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ५८, ६८९ रुपये आहे. तर ९९९ शुद्धतेची चांदी ७१,२५० रुपये आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, बुधवारी संध्याकाळी २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव ५७,९१० रुपये प्रति १० ग्रॅम होता, आज सकाळी तो ५८६८९ रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारावर सोने आणि चांदी दोन्ही महाग झाले आहेत.

 

आज सोन्या-चांदीचा भाव किती आहे?

ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, आज सकाळी ९९५ शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत ५८,४५४ रुपये झाली आहे. त्याचवेळी ९१६ शुद्धतेचे सोने आज ५३,७५९ रुपये झाले आहे. याशिवाय ७५० शुद्धतेच्या सोन्याचा भाव ४४,०१७ वर आला आहे. तसंच ५८५ शुद्धतेचे सोने महाग होऊन आज ३४,३३३ रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय ९९ शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज ७१,२५० रुपये झाला आहे.

First Published on: February 2, 2023 6:24 PM
Exit mobile version