दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट अंतर्गत गुण द्या, आशिष शेलारांची मागणी

दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट अंतर्गत गुण द्या, आशिष शेलारांची मागणी

आशिष शेलार

दहावीच्या विद्यार्थ्यांना कला आणि क्रिडा स्पर्धांचे अंतर्गत गुण सरसकट द्या, अशी मागणी भाजपा नेते माजी शिक्षणमंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे. कोरोनामुळे कला व क्रिडांच्या स्पर्धा झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान सरकारने करू नये. आज महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मुंबई शाखेच्या वतीने परेल येथे घेण्यात आलेल्या अधिवेशनात भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी अंतर्गत गुण सरसकट द्यावे, अशी मागणी केली.

ते पुढे असेही म्हणाले की, राज्य सरकारने ज्या पद्धतीने शिक्षण व्यवस्था, शिक्षक आणि विद्यार्थी यांचा पूर्ण बट्ट्याबोळ करण्याचं काम केल आहे. त्या विरोधात एल्गार करण्याची आवश्यकता आहे. त्याला पूर्ण समर्थ भारतीय जनता पक्षाचा असेल, अशी घोषणा शनिवारी या परिषदेत आमदार आशिष शेलार यांनी केली.

शैक्षणिक वर्षामध्ये कला आणि क्रीडा या विषयाच्या अंतर्गत गुण विद्यार्थ्यांना मिळणार की नाही याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या कला आणि क्रीडा विषयाच्या अंतर्गत गुण सरसकट विद्यार्थ्यांना मिळालेच पाहिजेत. कोरोनामुळे जर एलिमेंटरी पासून क्रिडा विषयीच्या परिक्षा झाल्या नसतील तर विद्यार्थ्यांचा दोष नाही. त्यामुळे प्रस्तावाची नुसती वेळ वाढवून देऊन चालणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सरसकट अंतर्गत गुण मिळाले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.


First Published on: February 13, 2021 1:59 PM
Exit mobile version