Lockdown: मुंबईकरांनो सावध व्हा! नाहीतर होईल लॉकडाऊन

Lockdown: मुंबईकरांनो सावध व्हा! नाहीतर होईल लॉकडाऊन

... तर मुंबईत लॉकडाऊन अटळ

मुंबईसह राज्यातमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. मुंबईत दररोज हजार नव्या रुग्णांची कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडत आहे. अशा परिस्थितीत काही जण कोरोनासंदर्भातले नियम पाळताना दिसत नाही आहेत. त्यामुळेच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी चिंता व्यक्त करत अंशतः लॉकडाऊनचा मुंबईकरांना इशारा दिला आहे. वेळ पडली आणि गर्दी केली तर अंशतः लॉकडाऊन जाहीर केला जाऊ शकतो. फक्त याचा अधिकार आयुक्त आणि कलेक्टर यांना आहे. तसेच जिथे जास्त गर्दी आढळले तिथे कडक निर्बंध लावण्यात येतील, असे मुंबईच्या पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना वाढत्या पार्श्वभूमीवर काल (सोमवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली. मुंबईचे कोरोनाबाधितांची संख्या वाढ आहे, याबाबत चर्चा झाली. केंद्रीय पथकाच्या अहवालामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचे कारण मुंबई लोकल, लग्न आणि सार्वजनिक समारंभ असल्याचे स्पष्ट केले होते. यावर देखील काल बैठकीत चर्चा केली असून रात्री अनेक ठिकाणी गर्दी होते, त्यावर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्बंध लागू करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. तसेच मुंबईत नाईट क्लब बंद होण्याची शक्यता जास्त असल्याचे समोर आले आहे.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले की, ‘रात्रीची गर्दी आणि नाईट क्लबवर होणारी कारवाई पाहता. सर्वात आधी मुंबईतील नाईट क्लब सर्वात आधी बंद करावे लागतील. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला काही ठिकाणी प्रतिसाद दिला जात नाही आहे, तरी काही ठिकाणी दिला जात आहे. त्यामुळे जर कोरोनाबाधितांची संख्या अशीच वाढली तर अंशतः लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते, असा संकेत शेख यांनी दिला आहे.


हेही वाचा – Coronavirus: राज्यातील कोरोनाला एक वर्ष पूर्ण; सध्याची काय आहे परिस्थिती?


 

First Published on: March 9, 2021 11:48 AM
Exit mobile version