हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत; कुर्ला ते टिळकनगर रेल्वे स्थानकादरम्यान पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकला

हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत; कुर्ला ते टिळकनगर रेल्वे स्थानकादरम्यान पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकला

हार्बर सेवा

आठवड्याच्या अखेरीस रविवारी मुंबईत हार्बर लाईनवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचे समोर आले आहे. कुर्ला आणि टिळक नगर स्टेशन दरम्यान मोठा बिघाड झाला असून रेल्वे मा्र्गावरील ओव्हर हेड वायरमध्ये लोकलचा पेंटाग्राफ अडकल्याने रेल्वेची हार्बर सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे वडाळा ते मानखुर्द पर्यंत वाहतूक सेवा ठप्प करण्यात आली आहे. तर सध्या केवळ मानखुर्द ते पनवेल वाहतूक आहे सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला आणि टिळक नगर स्टेशन दरम्यान मोठा बिघाड झाला असून पुढील एक तासभर तरी हार्बर रेल्वेसेवा ठप्प राहण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. या रेल्वेमार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये लोकलचा पेंटाग्राफ अडकल्याने ही सेवा विस्कळीत झाली आहे. या ओव्हरहेड वायरमधून रेल्वेला वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे रेल्वे धावत असते. मानखुर्द ते वडाळा हा मार्ग पुर्णतः ठप्प आहे.

या मार्गावरील ओव्हरहेड वायर दुरूस्तीचे काम सध्या सुरू आहे. या कामास साधारण एकतास लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे पुन्हा सुरळीत होण्यासाठी अकरा साडेअकरा वाजण्याची शक्यता असल्याची माहिती मिळतेय. मात्र तूर्तास मानखुर्द पनवेल दरम्यानची लोकल सेवा सुरू असून वडाळा मानखुर्द दरम्यान लोकलसेवा ठप्प आहे.


मुंबईत सरकारी जमिनींवर माफिया राज, २०० अवैध इमारती उभारल्या
First Published on: August 8, 2021 10:39 AM
Exit mobile version