घरमुंबईमुंबईत सरकारी जमिनींवर माफिया राज, २०० अवैध इमारती उभारल्या

मुंबईत सरकारी जमिनींवर माफिया राज, २०० अवैध इमारती उभारल्या

Subscribe

मुंबईत नेहमीच पावसाळा सुरू झाला की जुन्या इमारतीतील घऱं कोसळण्याच्या घटना सुरू होताना दिसतात. यंदाच्या पावसाळ्यात देखील मुंबई, मालाड, मालवणी, चेंबूर, विक्रोळी आणि इतर भागांमध्ये इमारती कोसळल्या यामध्ये ४० पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. असे असताना देखील प्रशासनाचे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये अशा कित्येक सरकारी जमिनींवर माफिया राज असल्याचे दिसतेय. मुंबईत सरकारी जमिनींवर २०० पेक्षा अधिक अवैध इमारती असल्याची धक्कादायक माहिती आरटीआयमधून समोर आली आहे.

भूमाफियांनी सरकारी जमिनी लाटण्याची प्रक्रिया सुरू

मुंबई मधील वर्सोवा कोळीवाडा या भागात भूमाफियांनी सरकारी जमिनी लाटण्याची प्रक्रिया सुरू असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते इफ्तेकार शहा यांनी महानगरपालिकेत केली. यामध्ये त्यांनी असेही सांगितले की, या जमिनी कलेक्टरच्या हद्दीतील जमिनी आहेत ज्या कधी काळी खाडीचा भाग होत्या. मात्र, गेल्या काही वर्षात या खाडीमध्ये माती, डेब्रिज टाकून त्यांना रिक्लेम केले गेले आणि त्याच्यानंतर त्याच्यावर अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, फक्त वर्सोवा परिसरामध्ये महानगरपालिकेने १८० पेक्षा अधिक अनधिकृत बांधकामांना स्टॉप वर्क नोटीस दिली आहे. मात्र, यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी सुद्धा महानगरपालिकेला करण्यात आल्या असून तरीही याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि आरटीआय कार्यकर्ते इफ्तेकार शहा यांनी यासंदर्भात जेव्हा माहितीच्या अधिकारात उत्तर मागितले असता यातून धक्कादायक माहिती समोर आली.

भूमाफियांचा सरकारी जमिनीवर कब्जा

इफ्तेकार शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कलेक्टर जमिनीवर कुठल्याही प्रकारचे बांधकाम करण्यास मनाई आहे आणि म्हणून अशा जमिनींवर बांधण्यात आलेल्या घर विकण्यास कुठल्याही प्रकारचे स्टॅम्प ड्युटी भरली जात नाही. वर्ष २००१, २०१० आणि २०२१ मधील गुगल मॅपवर सुद्धा असे दिसते की ग्रीन झोन असलेल्या या भागात भूमाफियांनी हळूहळू अनधिकृत निर्माण करून संपूर्ण परिसरावर कब्जा केला आहे.


आठवडाभरापासून एकनाथ खडसे बॉम्बे रूग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -