पावसाळी पिकनिक करा; पण जरा जपून!

पावसाळी पिकनिक करा; पण जरा जपून!

तुंगारेश्वर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी (छाया - संदीप टक्के)

पावसाळा सुरू झाला की प्रत्येकाला पावसाचा, धबधब्यांचा मनमुराद आनंद लुटावा असं वाटतं. पण, या धबधब्यांमध्ये जाताना त्या पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटक बुडाल्याच्या घटनाही घडतात. त्यामुळे, पावसाळी पिकनिक करा पण, जपून, असं आवाहन तज्ज्ञ डॉक्टर करतात. यंदा पडलेल्या पावसामुळे अनेक धरणं, तलाव ओव्हरफ्लो झाली आहेत. या पाण्यात अनेकदा पर्यटक वाहून जातात. त्यामुळे जीव गेल्याचं ही ऐकू येतं. असाच एक प्रकार पालघर परिसरात घडला आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला मीरारोडमध्ये राहणारे त्रिवेदी कुटुंब पावसाळी पिकनिकसाठी पालघर येथील एका छोट्याशा धबधब्यावर गेलं असता त्यांचा १७ वर्षांचा (गतिमंद) सचिन त्रिवेदी हा मुलगा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत होता. त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे तो तिथेच बेशुद्ध झाला. त्याला तात्काळ मीरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

सचिन त्रिवेदीच्या नाका तोंडात पाणी गेल्यामुळे त्याला ऍक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिन्ड्रोम म्हणजेच श्वास घेण्यास भरपूर त्रास झाला. याचसोबत त्याच्या किडनी आणि यकृताला सुद्धा जंतुसंसर्ग झाला असल्यामुळे त्याची तब्येत अजूनच खालावली होती. तब्बल दोन आठवड्याच्या डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्याला दोन दिवसापूर्वी घरी पाठवण्यात आलं आहे.
– अंकित गुप्ता, बालरोगतज्ज्ञ, वोक्हार्ट हॉस्पिटलचे क्रिटिकल केअर विभाग

अनियंत्रित पावसाळी पर्यटन रोखण्यासाठी प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. एखादा मोठा अपघात घडल्यावर आपण सर्व दोष यंत्रणेला देतो. परंतु नागरिकांनीसुद्धा पावसाळी पर्यटन करताना सावधानता बाळगणे फार महत्वाचे आहे, अशी माहिती वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे देण्यात आली आहे.

पावसाळी पिकनिकला हे करणं गरजेचं

First Published on: July 27, 2019 4:34 PM
Exit mobile version