घरमहाराष्ट्रभुशी धरण ओव्हरफ्लो; वाहणाऱ्या पर्यटकांना वाचवण्याचा थरार व्हिडिओत कैद

भुशी धरण ओव्हरफ्लो; वाहणाऱ्या पर्यटकांना वाचवण्याचा थरार व्हिडिओत कैद

Subscribe

लोणावळा येथे मुसळधार पावसाने कहर केला आहे. एका दिवसात तब्ब्ल ३७५ मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे भुशी धरण पुर्णपणे भरले असून ते ओसंडून वाहत आहे. भुशी धरणाच्या सांडव्यावरुन वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी शुक्रवारी एक कुटुंब आले होते, मात्र पाण्याच्या प्रवाहासोबत काही अंतरापर्यंत ते वाहून गेले. स्थानिक दुकानदार आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना वाचवले. त्यामुळे शनिवार आणि रविवारचे औचित्य साधून तुम्ही भुशी डॅमला फिरायला जायचा विचार करत असाल तर आताच प्लॅन बी तयार करुन ठेवा. पाऊस असाच सुरु राहिला तर भुशी डॅमवर जाण्यास प्रशासनाकडून मज्जाव केला जाऊ शकतो.

भुशी डॅमची विझिट जीवावर बेतू शकते

विकेंडला भुशी डॅमला जातायत? आधी हा व्हिडिओ पाहा

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಜುಲೈ 27, 2019

- Advertisement -

लोणावळ्यात काल पासून मुसळधार पाऊस पडल्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे कार्ला आणि मळवली भागात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. काही गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती उद्वभवली आहे. स्थानिक नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे.

मुसळधार पावसामुळे भुशी धरणाच्या सांडव्यावरुन पाणी वेगाने वाहत असल्यामुळे आता तेथे जाणे धोकादायक बनले आहे. शुक्रवारच्या घटनेनंतर आता अतिरीक्त खबरदारीचे उपाय राबविण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -