मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते वाहतुकीला ब्रेक, तर मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशिराने

मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते वाहतुकीला ब्रेक, तर मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशिराने

मुंबईसह आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी सकाळपासून पावसाने जोर धरला असून सखल भागांत पाणी साचले आहे. पावसाची संततधार कायम असल्याने रेल्वे वाहतुकही विस्कळीत झाली आहे. रस्ते जलमय झाल्याने नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे. तसेच, हवामना विभागानेही मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (Heavy rain in Mumbai thane and parts of raigad palghar)

मुंबईत सतत पडत असल्यामुळे दादर, सायन, माटुंगा, परळ, किंग्ज सर्कल, गांधी मार्केट परिसरात पाणी साचले आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. शिवाय मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळही पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशिराने सुरू आहे. परिणामी, रेल्वे प्रवाशांचा स्थानकात खोळंबा होत आहे. शिवाय लोकल वाहतूक उशिराने धावत असल्याने रेल्वे स्थनकात प्रवाशांची मोठी गर्दी जमली आहे.

मुंबईच्या अंधेरीमधील सब-वे पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी हा सब-वे बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान मुंबईसह आसपासच्या परिसरात रस्त्यांवर पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना महापालिका प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच, गरज पडल्यास घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

पुढच्या दोन तासात मुंबई, ठाणे आणि रायगड आणि पालघरच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर (kolhapur Rain Update) जिल्ह्यात मागच्या आठ दिवसांपासून मध्यम आणि मुसळधार पद्धतीचा पाऊस सुरु असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. त्यामुळे तिथं एनडीआरएफचं पथक दाखल करण्यात आलं आहे.

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ कायम आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी पोहोचली ३५ फूट दोन इंचावर त्यामुळे इशारा पातळीकडे वाटचाल झाली आहे. कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाची उघडझाप कायम आहे. जिल्ह्यातील ५४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.


हेही वाचा – मुसळधार! राज्यातील अनेक जिल्ह्यांत रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचे इशारा

First Published on: July 13, 2022 9:29 AM
Exit mobile version