घरगुती गॅसचा स्फोट! चार जखमी, एकाचा मृत्यू

घरगुती गॅसचा स्फोट! चार जखमी, एकाचा मृत्यू

Household gas explosion

डॉ.आंबेडकर रोड परिसरातील बैठ्या चाळीच्या घरात सिलिंडरचा स्फोट झाला आहे. यामध्ये घरातील चार सदस्य जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटामुळे भिंत पडून जखमी झाल्याने बाजूला राहणार्‍या एक वृद्ध महिला कांताबाई वानखडे यांचा मृत्यू झाला आहे.

संदीप काकडे यांच्या घरात हा सिलिंडरचा स्फोट झाला आहे. सुरुवातीला गॅस लीक झाला आणि त्यानंतर अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. यावेळी कुटुंबातील सर्वच सदस्य घरात असल्याने या घटनेत चौघे जखमी झाले. संदीप काकडे (40), लतिका काकडे (35), वंदना काकडे (50), आणि हिमांशू काकडे (12) अशी जखमींची नावे आहेत. यामध्ये वंदना काकडे 20 टक्के भाजल्या असून लतिका काकडे 35 टक्के भाजल्या आहेत. मात्र, या दुर्घटनेत शेजारी राहणार्‍या कांताबाई वानखडे यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर कांताबाई यांच्या घराची भिंत कोसळल्याने त्या यामध्ये जखमी झाल्या. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

स्फोट झाल्यानंतर तत्काळ ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन आणि फायर ब्रिगेडची टीम घटनास्थळी पोहोचली आणि बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. स्फोट कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मृत महिलेला आणि जखमींना जिल्हा प्रशासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

First Published on: December 26, 2018 5:25 AM
Exit mobile version