पुणे कोविड सेंटर घोटाळा प्रकरण: थेट चहावाल्याच्या दुकानात पोहोचले किरीट सोमय्या

पुणे कोविड सेंटर घोटाळा प्रकरण: थेट चहावाल्याच्या दुकानात पोहोचले किरीट सोमय्या

पुणे कोविड सेंटर घोटाळा प्रकरण: थेट चहावाल्याच्या दुकानात पोहोचले किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यातील कोविड सेंटरचे १०० कोटींचे कंत्राट मुंबईतल्या चहावाल्याला दिल्याचा आरोप केला होता. आज किरीट सोमय्यांनी या चहावाल्याला शोधून काढले आहे. या चहावाल्याच्या शोधात मुंबईतील केईएम हॉस्पिटलसमोर असलेल्या सह्याद्री हॉटेलमध्ये किरीट सोमय्या पोहोचले आणि तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांसोबत ते बोलले आणि हॉटेलची पाहणी केली. यावेळी किरीट सोमय्यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

आज अचानक किरीट सोमय्या परळमधील केईएम हॉस्पिटल समोर असलेल्या सह्याद्री हॉटेलमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी हॉटेलमालकाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान मात्र हॉटेलमालक तिथे हजर नव्हता. त्यानंतर किरीट सोमय्या माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘उद्धव ठाकरेंचे कारमाने बघा. कोविड सेंटरचे १०० कोटींचे कंत्राट सह्याद्री हॉटेलच्या मालकाला दिले आहेत. हा संजय राऊतचा बेनामी पार्टनर आहे. संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकरला १०० कोटींचे कंत्राट उद्धव ठाकरेंनी दिले. ३ रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर ब्लॅकलिस्ट केल्यानंतर आदित्य ठाकरेंना अतिरिक्त कंत्राट दिले. मुंबई, पुण्यातील कोरोना रुग्णांचे भविष्य आणि जीवन उद्धव ठाकरेंनी पैशासाठी अशा लोकांच्या हातत दिले आहे. या सह्याद्री हॉटेलमालकाचे नाव राजीव साळुंखे असून हा इन्कम टॅक्स भरत आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी जाब द्यावा.

दरम्यान आजच किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, ‘पुण्याच्या कोविड सेंटरमध्ये पारदर्शक पद्धतीने काम व्हावीत अशापद्धतीने कटाक्षाने प्रयत्न केला आहे. कोविड सेंटरच्या कामाशी कोणत्याही राजकीय व्यक्तीचा संबंध नाही. यामध्ये सौरव रावसह काही अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यांना जे काही करायचं आहे, ते अतिशय पारदर्शक पद्धतीने, चुकीच घटना काम नये, असे सांगण्यात आले होते.’


हेही वाचा – ठाकरे, राऊतांवर कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही


 

First Published on: February 12, 2022 12:55 PM
Exit mobile version