मुंबईकरांना कोरोनाचा विसर, गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी दादर फुलमार्केटमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर

मुंबईकरांना कोरोनाचा विसर, गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी दादर फुलमार्केटमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर

मुंबईकरांना कोरोनाचा विसर, गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी दादर फुलमार्केटमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर

मुंबईत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दोन दिवस सण आहेत त्यामुळे घरी राहून साधेपणाने सण साजरे करण्याचे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर त्याचबरोबर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही केले होते. मात्र मुंबईकरांनी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून दादरच्या फुलमार्केटमध्ये गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले. मुंबईत एकीकडे कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर होत असताना दुसरीकडे मुंबईकरांना मात्र कोरोनाचा विसर पडलेला दिसून येत आहे.

मुंबईतील दादर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. मंगळवारी सकाळी गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी दादर फुल मार्केटमध्ये लोकांची एकच गर्दी पहायला मिळाली. घरी राहून सण साजरे करा असे सांगितलेले असतानाही सोमवार मंगळवार दोन्ही दिवशी दादर फुल मार्केट गर्दी पहायला मिळाली. मोठ्या संख्येनी ग्राहकांनी दादर मार्केटमध्ये गर्दी केली होती. सोशल डिस्टन्सिंगचे कुठेही पालन केलेले पहायला मिळाले नाही. प्रशासनाचे सर्व नियम नागरिकांनी धाब्यावर बसवले.

मुंबई पोलीस त्याचप्रमाणे महापालिकेनेही वारंवार गर्दी न करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र नागरिकांकडून याबाबत कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सध्या राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. या संबंधीचा अंतिम निर्णय सरकार घेणार आहे. सर्व गोष्टींचा योग्य विचार करुन लॉकडाऊनची घोषणा करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.


हेही वाचा – मुंबईत प्रवेश करण्यापूर्वी कोरोना चाचणी होणार?
First Published on: April 13, 2021 3:55 PM
Exit mobile version