Corona: कोविड टास्क फोर्समधील महिला IAS अधिकारी पॉझिटिव्ह

Corona: कोविड टास्क फोर्समधील महिला IAS अधिकारी पॉझिटिव्ह

कोरोना व्हायरस विरोधात आपले कोरोना योद्धे जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत, अशा परिस्थितीत हा जीवघेणा कोरोना व्हायरस कोरोना योद्ध्यांना आपल्या विळख्यात घेताना दिसतोय. एकीकडे लॉकडाऊन संपल्यानंतर अनलॉक टप्पा सुरू करण्यात आला असून राज्य सरकार पुनश्च हरिओम केले आहे. तर लॉकडाऊनच्या काही नियमांमध्ये शिथिलता देखील आणली आहे.

दरम्यान, कोविड-१९ वर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या टास्क फोर्समधील महिला आयएएस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर येत आहे. मुंबईतील रुग्णालय विशेषतः कोरोनाच्या उपाययोजनांची महत्त्वाची जबाबदारी या अधिकाऱ्यावर आहे, परंतु आता त्यांनाच कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनाला हरवले आहे तर दुसरीकडे आतापर्यंत राज्य सरकारमधील दोन मंत्री आणि प्रशासनातील तीन अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.


केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या ११ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

मिळालेल्या माहितीनुसार, नव्या रुग्णांमध्ये जसे पोलीस कर्मचारी आहेत, तसेच आरोग्य यंत्रणेतले कोरोना योद्धा देखील आहेत. त्याशिवाय, बीएसटी कर्मचारी, सामान्य नागरिक असे मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असताना आता राज्याचा गाडा हाकण्याची जबाबदारी ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर असते, त्यांच्यामध्ये देखील कोरोनानं हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मुंबईत चर्चगेट परिसरात असलेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या यशोधन या इमारतीमध्ये तब्बल २८ कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे मुंबईच्या प्रशासकीय वर्गामध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आतापर्यंत प्रधान सचिव दर्जाचे ४ अधिकारी आणि ८ आयपीएस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रशासकीय वर्गामध्ये देखील आता चिंतेचं वातावरण आहे.

चाचणी केलेल्या ९० पैकी २८ जण पॉझिटिव्ह!

‘यशोधन’मध्ये मुंबईतल्या विविध विभागांमध्ये, मंत्रालयात आणि महत्त्वाच्या सरकारी आस्थापनांमध्ये काम करत असलेले सनदी अधिकारी राहतात. नुकतीच याच इमारतीत राहणारे वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय मुखर्जी यांच्या चालकाला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे इथल्या सर्व अधिकाऱ्यांच्या चालक, कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात चाचणी केलेल्या एकूण ९० जणांपैकी २८ जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे ‘यशोधन’मध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या या लॉकडाऊन काळात देखील द्या सनदी अधिकाऱ्यांमार्फत काही प्रमाणात राज्यातले सरकारी व्यवहार सुरू आहेत, त्याच अधिकाऱ्यांच्या दाराशी कोरोना आता पोहोचला आहे.

First Published on: June 8, 2020 5:57 PM
Exit mobile version