पालिकेच्या आयसीएसई, सीबीएसई शाळांची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून

पालिकेच्या आयसीएसई, सीबीएसई शाळांची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून

अद्याप शाळा-कॉलेज सुरू करण्यासाठी कोणतीही परवानगी नाही; केंद्रीय गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण

विद्यार्थ्यांसह पालकांचा सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांकडे असलेला ओढा लक्षात घेऊन मुंबई महापालिकेनेही यंदापासून या बोर्डांच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या माहीममधील आयसीएसई आणि जोगेश्वरीमधील सीबीएसई शाळेतील प्रवेश प्रक्रिया गुरूवारपासून सुरू होत आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने पालकांना अर्ज करता येणार आहे.

ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने होणार प्रवेश

मुंबई महापालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलअंतर्गत जोगेश्वरी पूर्वेकडील पूनम नगर मनपा शाळामध्ये सीबीएसई तर माहीम पश्चिमेकडील वूलन मिल्स या शाळेमध्ये आयसीएसई बोर्डाची शाळा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ज्युनियर, सिनियर केजी पहिली ते सहावीचे वर्ग २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. या शाळांच्या प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया २७ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीत राबविण्यात येणार आहे. http://bit.do/Mybmc-ICSE-CBSE या संकेतस्थळावर पालकांना ऑनलाईन अर्ज करता येईल. तर ऑनलाईन प्रवेश अर्ज शाळांमध्ये उपलब्ध होणार आहेत. ऑनलाईन अर्ज सोमवार ते शनिवारदरम्यान सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० पर्यंत भरता येणार आहे. त्यानंतर अर्जांची प्राथमिक छाननी आणि पालकांशी संवाद १३ ते २४ मार्चदरम्यान होणार आहे. प्रवेशाची पहिली यादी संकेतस्थळ आणि शाळेच्या सूचना फलकावर २४ मार्चला जाहीर होईल. २६ ते २८ मार्चदरम्यान लॉटरी प्रक्रियेमार्फत प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत.

चालू शैक्षणिक वर्षासाठी दुसरीपर्यंतचे वर्ग सुरू केले जातील. इयत्ता तिसरी ते सहावीच्या वर्गात किमान १० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास तिसरी ते सहावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. ज्या इयत्तेत प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची संख्या ४० पेक्षा अधिक असेल तर प्रवेश प्रक्रिया सोडतीद्वारे राबविण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत शाळेपासून ३ किलोमीटर परिसरात वास्तव्य करणार्‍या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. दोन्ही शाळांमध्ये तृतीय भाषा म्हणून मराठी अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांना पालिकेमार्फत पुरविण्यात येणार्‍या सर्व सुविधाही या विद्यार्थ्यांना देण्यात येतील.


हेही वाचा – करोना व्हायरस: महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवासी तपासणीत आणखी दोन देशांची भर


 

First Published on: February 26, 2020 9:43 PM
Exit mobile version