नाट्यगृहांची स्थिती सुधारा, प्रशांत दामलेंची विनंती मुख्यमंत्र्यांकडून तत्काळ मान्य

नाट्यगृहांची स्थिती सुधारा, प्रशांत दामलेंची विनंती मुख्यमंत्र्यांकडून तत्काळ मान्य

मुंबई – राज्यातील ५१ नाट्यगृहांची लवकरच डागडुजी करण्यात येईल, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. ज्येष्ठ नाट्यअभिनेते प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या नाटकाचे १२५०० प्रयोग झाल्याच्या निमित्ताने मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात त्यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रशांत दामले यांचं कौतुक करत होते. तेवढ्यात दामले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना अडवून सर्वांच्या वतीने विनंती केली. ते म्हणाले की, सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व नाट्यनिर्माते, नाट्यकलाकार आणि नाट्य रसिकांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो की राज्यातील चालू स्थितीतील ५१ नाट्यगृहांची परिस्थिती सुधारा. त्यावर एकनाथ शिंदे यांनी त्यांची ही मागणी तत्काळ मागणी केली.


एकनाथ शिंदे म्हणाले की, येथे अर्थमंत्रीही येथे आहेत. हा मुद्दा आमच्या मागच्या बैठकीतही निघाला आहे. नाट्यगृहांची डागडुजी आम्ही करणारच आहोत. यासाठी नोडल अधिकारी नेमून पाहणी केली जाईल. त्यामार्फत अडचणी दूर केल्या जातील, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी केलं.

ठाण्यात चित्रनगर उभाणार

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातही चित्रिकरणे वाढली आहेत. अनेक मराठी मालिकांचे चित्रिकरण ठाण्यात होत आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व चित्ररसिकांना महत्त्वाचे आश्वासन दिले. ठाण्यातही चित्रनगरी उभारू असं एकनाथ शिंदे.

First Published on: November 6, 2022 6:32 PM
Exit mobile version