आज भारतीय चित्रपटसृष्टीला 110 वर्ष पूर्ण

आज भारतीय चित्रपटसृष्टीला 110 वर्ष पूर्ण

इतिहासात प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. 3 मे ही तारीख देखील भारतीय चित्रपटसृष्टीसाठी खूप महत्त्वाची आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 3 मे 1913 साली पहिला भारतीय मूक चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला गेला.

‘राजा हरिश्चंद्र’ 1913 मध्ये प्रदर्शित झालेला पहिला भारतीय मूक चित्रपट

राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला मूकपट होता. याचे दिग्दर्शक आणि निर्मिती दादासाहेब फाळके यांनी केली होती. हा चित्रपट भारतीय पौराणिक राजा हरिश्चंद्र यांच्या कथेवर आधारित होता. चित्रपटात काम करणारे सर्व कलाकार मराठी असल्यामुळे हा चित्रपटही मराठी चित्रपटांच्या श्रेणीत आला. या चित्रपटात दत्तात्रेय दामोदर दाबके यांनी राजा हरिश्चंद्राची प्रमुख भूमिका केली होती. तर अण्णा साळुंके नावाच्या अभिनेत्याने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला.

यंदा या चित्रपटाला जवळपास 110 वर्षे पूर्ण झाली असून या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत मनोरंजकता निर्माण केली. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक कामगिरी ठरला आहे.

 


हेही वाचा :

सिंगल मदर असल्याने चारुला घर मिळेना, अभिनेत्री म्हणाली…

First Published on: May 3, 2023 12:39 PM
Exit mobile version