जमील शेख हत्या प्रकरण : महाराष्ट्रात खूनाला उत्तर खूनाने सुरू झाल्यास…. राज ठाकरे कडाडले

जमील शेख हत्या प्रकरण : महाराष्ट्रात खूनाला उत्तर खूनाने सुरू झाल्यास….  राज ठाकरे कडाडले

ठाणे येथील मनसे पदाधिकारी जमील शेख यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. शेख यांच्यावर दुचाकीवरुन जाणाऱ्या आरोपीने गोळ्या झाडल्या होत्या, त्या आरोपीला महाराष्ट्र पोलीसांनी लखनऊ टास्क फोर्सच्या मदतीने अकट केली आहे. जमील शेख यांच्या हत्येमध्ये राष्ट्रवादीचे नेते नजीम मुल्ला यांचे नाव आले आहे. यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ह्यांनीही ह्या प्रकरणाची दखल घ्यावी. असे राजरोसपणे खून पडायला लागले तर ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही. ह्यासंबंधी शरद पवारांची भेट घेणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

आमच्या पक्षाचा एक पदाधिकारी जमील शेख महाराष्ट्र पोलिसांनी सगळे शोधून काढले आहे. उत्तर प्रदेशला गेले तेथून सगळ्या गोष्टी शोधून काढल्या आहेत. तिथे स्पेशल टास्क फोर्सची एक प्रेस नोट आली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीम मुल्ला आहेत त्यांचे नाव खुनामध्ये आले आहे. त्या प्रेस नोटमध्ये असे लिहिले आहे की, यह हत्या नजीब मुल्ला निवासी राबोडी जनपथ ठाणे, महाराष्ट्र जो एनसीपी नेता (कॉर्पोरेटर) है, के केहनेपर सुपारी देणेपर किया गया था इस हत्या के एवज मे मुझे २ लाख मिलने वाला था, ओसामाने नजीम मुल्ला से कितने रुपये में डील किया था मुझे पता नाही, एफआयआरमे शक नजीम मुल्ला पर किया गया था असे प्रेसनोटमध्ये लिहिण्यात आले आहे.

यावर राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, ही अशी सत्ताधाऱ्यांची ही माणसे दिवसा-ढवळ्या खून करत आहेत. याच नजीम मुल्लाचे नाव हे सुरज परमार ज्यांनी आत्महत्या केली होती. त्या आत्महत्या केलेल्या त्यांच्या सुसाईड नोटमध्ये नाव लिहिलेले होते. त्याच्यानंतर ही केस रफादफा झाली त्यावर पुन्हा काय झाले नाही मात्र पुन्हा नजीम मुल्लाचे नाव आलेले आहे. आता राज्य सरकार काय करत आहे याची मी वाट पाहतो आहे. परंतु याबाबत लवकरच मी शरद पवार यांची भेट घेणार आहे.

अशी जर मंडळी यांना पक्षामध्ये सांभाळायची असेल तर दुसऱ्यांचे हात काय बांधलेले नसतात आणि मग या सगळ्या गोष्टींना खुणाने उत्तर खुणाने सुरु झाल्या सुसंस्कृत महाराष्ट्रात सुरु झाल्या तर त्या चांगल्या दिसणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना आवर घालणे आवश्यक आहे. नजीम मुल्लावर कारवाई होणे गरजेचे आहे. अटक होणे गरजेचे आहे आणि त्याला शिक्षा होणे गरजेचे आहे. यासाठी लवकरच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

First Published on: April 6, 2021 2:11 PM
Exit mobile version