काळा घोडा फेस्टिवलला सुरुवात; तरुणाईचा उस्फुर्त प्रतिसाद

काळा घोडा फेस्टिवलला सुरुवात; तरुणाईचा उस्फुर्त प्रतिसाद

काळा घोड कला महोत्सव चर्चगेट

काळा घोडा कला महोत्सवाला (केजीएएफ) कालपासून म्हणजेच २ फेब्रुवारीला सुरवात झाली आहे. यावर्षी २० व्या वर्षात पदार्पण केले. १९९८ साली या महोत्सवाला सुरूवात करण्यात आली. वीस वर्षांनतर या महोत्सवाची गर्दी वाढतच चालली आहे. हा उत्सव संस्कृती, सिनेमा, रंगमंच, संगीत आणि खरेदीसाठी अनेक मुंबईकर तसेच खासकरुन तरुणाई काळा घोडा महोत्सवाकडे वळते. आजपासून १० फेब्रुवारी पर्यंत हा महोत्सव सकाळी १० ते संध्याकाळी १० पर्यंत चालू राहणार आहे.

यावर्षीचे आकर्षण महात्मा गांधी थीम

महात्मा गांधींच्या जयंतीला १५० वर्ष पुर्ण झाल्याचे औचित्य साधून महात्मा गांधींना मुख्य थीम म्हणून ठेवण्यात आले आहे. यानिमित्त आर्ट गॅलरी येथे एक प्रदर्शन आयोजित केले जाईल. लोकांनी गांधी विचारांचा अवलंब करावा, गांधीचे विचार आचरणात आणावेत, त्यांचा आदर करावा, असा केजीएएफचा उद्देश आहे. केजीएएफचे समन्वयक निकोल मोदी यांनी सांगितले की, “काळा घोडाच्या क्रिएटिव्ह हबने २० वर्षांच्या कालावधीत नेहमीच व्हिज्युअल आणि परफॉर्मिंग आर्ट इंडस्ट्रीमध्ये सामील असलेल्या विविध समुदायांना मान्यता दिली आहे. संपूर्ण देशभरातून अभूतपूर्व पाठिंबा मिळाल्याने केजीएफने यशस्वी कामगिरी केली आहे”.

देशातील सर्वात प्रमुख कला आणि संस्कृती महोत्सवापैकी काला घोडा कला महोत्सव संस्कृती, चित्रपट, रंगमंच कला आणि संगीत यांचे मिश्रण देत आहे आणि नवीन विचारांवर आणि कल्पनांवर आंतरराष्ट्रीय भाषणासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे.

First Published on: February 3, 2019 4:51 PM
Exit mobile version