घरमनोरंजनकाळा घोडा कला महोत्सव

काळा घोडा कला महोत्सव

Subscribe

मुंबईत जे वेगवेगळे कला महोत्सव होतात त्यात ‘काळा घोडा कला महोत्सव’ हा सर्वसामान्यांच्याही आकर्षणाचा भाग राहिलेला आहे. त्याला कारण म्हणजे कलेतली विविधता, नावीन्यता अनेक संकल्पनात पहायला मिळते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अनेक हौशी कलाकारांबरोबर नामवंत चित्रकार या महोत्सवात सहभागी होत असतात. चित्रकलेच्या संदर्भात जेवढ्या म्हणून संस्था मुंबईत कार्यरत आहेत त्या या महोत्सवात सहभागी होत असतात. चित्रकला, रांगोळी, शिल्पकला, हस्तकला, छायाचित्र यांचे अनोखे दर्शन सामान्य माणसांना भुरळ पाडत असते. नवनवीन अनेक वस्तू इथे विक्रीसाठी उपलब्ध असतात. आपले व्यक्तीमत्त्व खुलवता येेईल असे कपडे, अलंकार रंगसंगती साधून इथे घेता येतात. त्यामुळे हा महोत्सव सामान्य माणसाचा असतो तसा तो प्रतिष्ठितांचाही असतो. यंदा २ ते १० फेब्रुवारी या कालावधीमध्ये हा महोत्सव काळा घोडा येथे होणार आहे.

‘काळा घोडा कला महोत्सव’ या नावाने या महोत्सवाची ओळख आहे. परदेशातसुद्धा या महोत्सवाविषयी प्रचंड आकर्षण आहे. ‘स्ट्रीट फेस्टीव्हल’ म्हणूनही या महोत्सवाची ओळख आहे. यंदा या महोत्सवाचे वीसावे वर्ष आहे आणि योगायोगाने महात्मा गांधी यांची १५० वी जयंतीही आहे. त्यांचे जगभरात असलेले नाव, त्यांनी मांडलेल्या विचारांचे अनुकरण बर्‍याचशा देशांनी केलेले आहे. याच हेतूने मोठ्या प्रमाणात कलेच्या माध्यमातून गांधीजींची विविध रूपे दिसतील, असे पाहिले जाणार आहे. मनेक दावर हे या फेस्टीव्हलचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या संकल्पनेला नामांकित चित्रकार कलात्मक असा आकार देणार आहेत. कलीनरी डिलाईट्स, डॉक्युमेंटरी स्क्रिनींग, द मॅजिक ऑफ फ्लूट, म्युझीकल नोट्स, द एव्हरग्रीन शान, द नॅशनल हिरोज्, गेट सेट ड्रोन हे यंदाच्या महोत्सवाचे आकर्षण आहे. प्रदर्शन पाहण्याबरोबर प्रात्यक्षिके दाखवण्यावर आयोजकांचा भर असणार आहे. भारतीय पाहुण्यांबरोबर परदेशी साहित्यिक, चित्रकारही यात सहभागी होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -