कल्याण-डोंबिवलीकरांनो सावधान! रस्त्यावर थुंकल्यास भरावा लागणार दंड

कल्याण-डोंबिवलीकरांनो सावधान! रस्त्यावर थुंकल्यास भरावा लागणार दंड

रस्त्यावर थुंकाल तर भरावा लागणार दंड

ठाण्याच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवलीत शुक्रवार पासून ‘क्लीन-अप मार्शल’ तैनात ठेण्यात आले आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांना सावधान राहावे लागणार आहे. कारण रस्त्यात थुंकल्यास, अस्वच्छता केल्यास दंड भरावा लागणार आहे. शुक्रवारपासून क्लीन-अप मार्शलच्या कारवाईला सुरुवात होऊन नागरिकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कल्याण-डोंबिवली शहराचा ‘स्मार्ट सिटी’मध्ये समावेश झाला असला तरीसुद्धा अस्वच्छ शहरांच्या यादीत कल्याण-डोंबिवलीचे नाव झळकले. ही ओळख पुसण्यासाठी पालिकेकडून मागील काही वर्षांपासून विविध पातळीवर कार्य सुरू आहे. त्यानुसार आता शहरांच्या स्वच्छतेसाठी पालिकेकडून क्लीन-अप मार्शलची नियुक्ती करण्यात आली आहे.

सुरुवातीला शहरातील या भागांवर लक्ष

कल्याण-डोंबिवली शहराची स्वछता राखण्यासाठी पालिकेकडून खाजगी एजन्सी मार्फत स्वछता मार्शल नेमण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात कल्याणमधील अ, ब, क या प्रभागात ५० आणि डोंबिवलीत फ व ग या प्रभागात क्लीन-अप मार्शल तैनात असणार आहेत.

क्लीन-अप मार्शल दंड ठोठावताना

स्वच्छता मार्शल्सचा भार पालिकेवर नाही

शुक्रवारी सकाळपासून स्टेशन परिसरात मार्शलच्या कारवाईला सुरुवात झाली. दिवसभरात पाच ते सहा हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला. काही दिवस हे मार्शल विविध आस्‍थापना, दुकाने, मॅरेज हॉल, सार्वजनिक सभागृहे येथे जनजागृती करणार आहेत. तसेच प्रभागातील पान टपऱ्या, ठेले, हातगाड्या यांच्‍या आजुबाजूला स्‍वच्‍छता राखण्यासाठी कचराकुंडया ठेवण्‍यास दुकानदारांना उद्युक्त करण्‍यात आले. या स्‍वच्‍छता मार्शल्‍सनी वसूल केलेल्‍या रकमेतील ६३ टक्‍के रक्‍कम महापालिकेस देण्‍यात येणार असून, ३७ टक्‍के रक्कम संबंधित एजन्‍सीला देण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे महापालिकेवर या स्‍वच्‍छता मार्शल्‍सचा दैनंदिन आर्थिक भार पडणार नाही, असे पालिकेकडून सांगण्यात आले.

क्लीन-अप मार्शल दंड ठोठावताना

मागील ३ वर्षांपासून जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन

गेल्‍या ३ वर्षापासून स्‍वच्‍छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत महापालिका क्षेत्रात जनजागृती तसेच विविध उपाययोजना करण्‍यात येत आहेत. ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करणे, ओल्‍या कचऱ्यावर प्रक्रिया करणे यासाठी गृहनिर्माण संस्‍थांना महापालिकेतर्फे मालमत्ता करात ५ टक्‍के सुटही देण्यात आली आहे.

या कारणासाठी होणार दंड

रस्‍ते, मार्गावर अस्वच्छा पसरणे – १५० रुपये
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे – १०० रुपये
उघड्यावर लघुशंका करणे – १०० रुपये
उघड्यावर शौच करणे – ५०० रुपये

हेही वाचा – ‘…तरीही दर पावसाळ्यात मुंबई पाण्यात’

First Published on: August 16, 2019 7:52 PM
Exit mobile version