घरमुंबई'...तरीही दर पावसाळ्यात मुंबई पाण्यात'

‘…तरीही दर पावसाळ्यात मुंबई पाण्यात’

Subscribe

मुंबई महापालिकेच्या कारभारावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ताशेरे ओढले आहेत. यावर आता शिवसेना कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

मुंबई महापालिकेचे ५८ हजार कोटी फिक्समध्ये जमा आहेत, मात्र तरीसुद्धा दरवर्षीच्या पावसाळ्यात मुंबई पाण्याखाली का दिसते, असा प्रश्न उपस्थित करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले आहेत. अंदमान आणि निकोबारनंतर देशांतर्गत भागात पहिलं कांदळवन उद्यान मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोराई या ठिकाणी उभारण्यात येत आहे. या उद्यानाच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्यांनी मुंबई महापालिकेच्या ढिसाळ कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यासोबतच मुंबई महापालिकेच्या मुंबई स्वच्छ ठेवण्याच्या इच्छाशक्तीवर त्यांनी भाष्य केले. यावर आता शिवसेना कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – नारायण राणेंच्या आत्मचरित्राचं प्रकाशन; दिग्गजांनी सांगितले राजकीय किस्से!

काय म्हणाले नितीन गडकरी?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ”मुंबई महापालिकेचे ५८ हजार कोटी फिक्समध्ये जमा आहेत. मात्र तरीसुद्धा दर पावसाळ्यात मुंबई पाण्याखाली का?” असे म्हणत ते पुढे म्हणाले की, ”यंदा मुंबईत पावसामुळे रेल्वे सेवा ठप्प पडून मुंबईत चांगलीच दाणादाण उडाल्याचे पहायला मिळाले. मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणीही साठले होते याकडेही लक्ष वेधलं.” यावेळी त्यांनी पालिकेच्या इच्छाशक्तीवर भाष्य केले. ते म्हणाले की, ”मुंबई महापालिकेने मनात आणले तर येथील समुद्र किनारेसुद्धा मॉरिशसमधील समुद्रकिनाऱ्यांप्रमाणे नितळ काचेप्रमाणे दिसतील.” पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नितीन गडकरी पुढे म्हणाले की, ”मुंबईत माझी ये-जा कमी असली, तरी मी स्वतःला मुंबईकर समजतो. मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेबरोबर इटलीप्रमाणे मुंबईतसुद्धा वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात आली पाहिजे, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.”

- Advertisement -

दरम्यान नितीन गडकरी यांनी दिल्लीतील प्रदूषणाबाबत देखील माहिती दिली. ते म्हणाले की, ”नवीन प्रदूषण नियंत्रण योजनेमुळे दिल्लीचं प्रदूषण २६ टक्क्यांनी कमी झाले आहे,” असे त्यांनी स्पष्ट केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -