कल्याणमधील भाजी मंडईतील भष्ट्राचार उघड

कल्याणमधील भाजी मंडईतील भष्ट्राचार उघड

सामाजिक कार्यकर्ते शंकर साळवे यांनी भाजी मंडईतील भष्टाचार उघड

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सावतामाळी भाजी मंडईतील दिव्यांगांच्या कोट्यातील गाळे हडपण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याणचे सामाजिक कार्यकर्ते शंकर साळवे यांनी माहितीच्या अधिकारातून हे उघडकीस आणले आहे. अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी कल्याणच्या डीसीपी यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी पत्रव्यवहार

कल्याण पश्चिमेच्या संतोषी माता रोड परिसरात ही सावतामाळी भाजी मंडई आहे. या भाजी मंडईतील दिव्यांगांच्या कोट्यातील गाळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या संगनमताने हडप केल्याचा प्रकार शंकर साळवे यांनी उघडकीस आणले आहे. या भाजी मंडईत एकूण ३३ गाळे आणि ३०२ ओटे आहेत. ३०२ पैकी ८ ओटे हे रस्ता रूंदीकरण्यात बाधीत झालेल्या अथवा विस्थापित झालेल्यांना वाटप करण्यात आले आहेत. तसेच पहिल्या मजल्यावरील ३३ गाळे अंध, अपंग महीला यांना नाशवंत नसलेल्या वस्तू विक्री करण्यासाठी आयुक्तांकडून मंजुरी दिली आहे. मात्र हे सर्व गाळे त्या महिला चालवत नसून गाळे विजय सेल्सला भाड्यावर देण्यात आले आहेत. ही माहिती साळवे यांनी माहितीच्या अधिकारातून समोर आणली आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी साळवे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे पत्रव्यवहारसुद्धा केला आहे.

प्रशासनासोबत लढा चालूच

शंकर साळवे यांचा प्रशासनाबरोबरचा लढा हा अनेक वर्षांपासून सुरू आहे. महापालिकेने कल्याण स्टेशन परिसरात रस्ता रूंदीकरण करताना त्यांची टपरी तोडली गेली. मात्र अनेक वर्ष पाठपुरावा केल्यानंतर ही त्यांना गाळा मंजूर करण्यात आला नाही. दिव्यांग पतीपत्नी सोबत महापालिका आयुक्त, उपायुकत तसेच मालमत्ता विभाग भेदभावाची वागणूक देत असल्याने त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी साळवे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली होती. अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी कल्याणचे पोलीस उपायुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

First Published on: February 20, 2019 9:58 PM
Exit mobile version