कल्याणकरांची पत्रीपूलाला श्रद्धांजली

कल्याणकरांची पत्रीपूलाला श्रद्धांजली

कल्याणकरांची पत्रीपूलाला श्रद्धांजली

बहुचर्चित ठरलेल्या पत्रीपुलावरील वाहतूक बंद करून एक वर्ष झाले. हा पत्रीपूल पाडण्यात आला. तीन महिन्याच्या कालावधीत त्याची पूनर्बांधणी होणार होती. मात्र, पत्रीपूल तयार झाला नाही. पूल पाडून एक वर्ष झाला. परंतु, तरीही नवा पूल उभारण्यात आला नाही. त्यामुळे कल्याणकरांनी पत्रीपूलाचे प्रथम पुण्यस्मरण दिवस मानत पत्रीपूलाला श्रद्धांजली वाहिली. यावेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. त्याचबरोबर ‘गणपती बाप्पा सत्ताधाऱ्यांना सुबुद्धी दे’ असेही फलक लावण्यात आले.

हेही वाचा – अजून सहा महिने पत्रीपूलाचा त्रास सहन करावा लागणार

काय आहे नेमके प्रकरण?

कल्याण पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा पत्रीपूल वाहतूकीसाठी बंद करून एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र पत्रीपूलावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पत्रीपूलाचे काम कासवगतीने सुरू असल्याने त्याचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. पत्रीपूलाच्या धीम्या कामाविरोधात राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांकडून अनेकवेळा आंदोलनही केली आहेत. गुरूवारी स्थानिक नागरिकांनी एकत्रित येत पत्रीपूलाच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम केला. यावेळी राज्य सरकारच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध केला. गणपती सण तोंडावर आला आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात पत्रीपुलावरील वाहतूक कोंडीचा नागरिकांना सामना करावा लागणार आहे. पत्रीपुलावरील वाहतूक केांडी आणि खड्डयांमुळे एका नागरिकाला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर जागे झालेल्या एमएसआरडीसीने हा पूल फेब्रुवारी २०२० मध्ये होईल असे फलक लावले. राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळेच अजून सहा महिने नागरिकांना वाहतूक केांडीचा त्रास सहन करावा लागणार अशी नाराजी स्थानिक रहिवाशी शकिल शेख यांनी व्यक्त केली,

First Published on: August 29, 2019 8:46 PM
Exit mobile version