घरमुंबईअजून सहा महिने पत्रीपूलाचा त्रास सहन करावा लागणार

अजून सहा महिने पत्रीपूलाचा त्रास सहन करावा लागणार

Subscribe

तब्बल वर्षभरानंतर एमएसआरडीसीला जाग आली आहे. पत्रीपूलाच्या कामासंदर्भातील माहिती फलकावर जाहीर केली आहे. फेब्रुवारी २०२० पर्यंत पत्रीपूलाचे काम मार्गी लागणार असून वाहतुकीस खुला होईल, असा आशावाद एमएसआरडीसीने व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षभरापासून कल्याणच्या पत्रीपूलावर वाहतूक कोंडीचा मनस्ताप वाहन चालक आणि नागरिक सहन करीत आहेत. मात्र वाहतूक कोंडीचा हा मनस्ताप अजून सहा महिने नागरिकांना सहन करावा लागणार आहे. तब्बल वर्षभरानंतर एमएसआरडीसीला जाग आली आहे. पत्रीपूलाच्या कामासंदर्भातील माहिती फलकावर जाहीर केली आहे. फेब्रुवारी २०२० पर्यंत पत्रीपूलाचे काम मार्गी लागणार असून वाहतुकीस खुला होईल, असा आशावाद एमएसआरडीसीने व्यक्त केला आहे. ब्रिटीशांनी १०४ वर्षांपूर्वी बांधलेला पत्रीपूल ऑगस्ट २०१८ मध्ये वाहतूकीसाठी बंद करून नोव्हेंबरमध्ये पाडण्यात आला. रेल्वे आणि एमएसआरडीसी याठिकाणी नवीन पूल उभारणार आहेत. ३० डिसेंबर २०१८ ला पत्रीपूलाच्या कामाचे भूमिपूजनही पार पडले. दीड महिन्यात हा पूल पूर्ण पाडून त्याजागी पुढच्या तीन महिन्यात नवीन पूल उभारण्याचं आश्वासन एमएसआरडीसीने दिलं होतं.

हेही वाचा – पत्रीपूलाचे काम कधी होणार?; कल्याणकरांचा संतप्त सवाल

- Advertisement -

तब्बल अर्धा ते पाऊण तासाचा खोळंबा

ऑगस्ट २०१८ ते ऑगस्ट २०१९ या एक वर्षाच्या कालावधीत शेजारील एका पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू असल्याने प्रचंड वाहतूक केांडीचा सामना नागरिकांना करावा लागतोय. कल्याणचा पत्रीपूल हा कल्याण डोंबिवली शहरांना जोडणारा असला तरीसुध्दा भिवंडी़ -कल्याण शीळ हा रस्ता प्रामुख्याने कल्याणच्या पत्रीपूलावरून जातो. त्यानंतर हा रस्ता पुढे नवी मुंबई, तळोजा, पनवेल, मुंबई, नाशिक महामार्गाला जोडला जातो. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. तब्बल अर्धा ते पाऊण तासाचा खोळंबा पत्रीपूलावर सहन करावा लागत आहे. दररोजच्या वाहतूक केांडीला सर्वसामान्य नागरिक वाहनचालक कंटाळले आहेत. कल्याण पत्रीपूलावरील वाहतुकीमुळे शहरातील विविध भागात आणि चौकातही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे अंतर्गत वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो. पत्रीपूलावरील खड्ड्यांमुळे एका नागरिकाला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी पत्रीपूलाच्या वाहतूककेांडीमुळे मोर्चे, आंदोलन केली. अखेर एक वर्षानंतर एमएसआरडीसीला जाग आली आहे. रविवारी एमएसआरडीसीने पत्रीपूलाच्या कामाचा फलक त्या ठिकाणी लावला आहे. फेब्रुवारी २०२० पर्यंत पुलाचे काम होईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. २२ पैकी ५ पाईलचे काम पूर्ण झाले असून ५ प्रगती पथावर आहे. तसेच हैद्राबाद येथील रेल्वे मार्फत मंजूर असलेल्या कार्यशाळेत ओप वेब स्ट्रिल गर्डर तसेच सेमी थ्रु टाईप स्ट्रिल गर्डरचे बांधणी काम प्रगतीपथावर आहे.

हेही वाचा – पत्रीपूलाच्या कामाची नाराजी सत्ताधाऱ्यांना भोवणार!

- Advertisement -

पुत्री पुलाच्या कामाची माहिती

पुलाची लांबी : ११० मीटर
पुलाची रूंदी : ११ मीटर
पुलाची संरचना : ओपन वेब स्ट्रील गर्डर ७७ मीटर, सेमीर भ्रु टाईप ३३ मीटर
पायाचा प्रकार : १२०० मी मी व्यासाचे २२ नगर पाईल फाऊंडेशन
स्तंभ : ३ नग ( २ अब्रुटमेंट व १ पीयर )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -