करुणा शर्मांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या…

करुणा शर्मांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या…

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर करुणा शर्मांनी धक्कादायक आरोप केला आहे. धनंजय मुंडेंनी खंडणीचा आरोप करून माझ्या बहिनीला तुरूंगात डांबल्याचा आरोप करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी केला आहे. करुणा शर्माची बहीन रेणू शर्मा धनजंय मुंडेंवर (Dhananjay Munde) वर्षभारापासून आरोप करत असून ती एका पत्रकार परिषदेत मोठा खुलासा करणार होती. मात्र, त्यापूर्वी पोलिसांनी खोट्या आरोपाखाली तीला अटक केल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.

खोट्या तंक्रारी करून अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप –

करुणा शर्मांनी (Karuna Sharma) आज पत्राकार परिषद घेत धनंजय मुंडेंवर आरोप केले. यावेळी धनंजय मुंडे मंत्री पदाचा गैरवापर करत आहेत. त्यांनी खोट्या तंक्रारी करून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप धनंजय मुंडेवर (Dhananjay Munde) केला. यावेळी धनंजय मुंडे स्वत:10 मोबाईल क्रमांक वापरतात. ते एवढे मोबाईल क्रमांक कशासाठी वापरतात?, असा प्रश्न करुणा शर्मा यांनी विचारला आहे. एखादी वाईट काम करणारी महिलाही इतके क्रमांक वापरत नाही मग धनंजय मुंडे इतक्या मोबाईल क्रमांकांचा वापर का करतात, असाही प्रश्न करुणा शर्मांनी विचारला आहे.

9 एप्रिल रोजी केले होते ट्विट –

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात तक्रार देण्यापूर्वी रेणू शर्मांनी 9 एप्रिल रोजी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी धनंजय मुंडेंचा भांडाफोड करणार असल्याचे म्हटले होते. पण त्याआधीच रेणू शर्माला खंडणीच्या खोट्या आरोपाखाली तुरूंगात डांबल्याचा आरोप करुणा शर्मांनी केली आहे.
नार्को टेस्ट करण्याची मागणी –

धनंजय मुंडे आणि रेणू शर्मांचे संबंध होते. या संबंधामध्ये रेणू शर्मांच्या आईचा खून कोणी केला. या विषयी पुरावे रेणू शर्मा देणार होत्या. ते पुरावे नष्ट करण्यासाठी रेणू शर्माचे सर्व मोबाईल लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पोलिसांनी जप्त केले आणि ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोप करूणा शर्मा (Karuna Sharma) यांनी केला आहे. यावेळी त्यांनी रेणू शर्मा आणि धनंजय मुंडेंची नार्को टेस्ट करावी म्हणजे सत्य समोर येईल असे करूणा शर्मांनी म्हटले आहे.

First Published on: June 1, 2022 4:19 PM
Exit mobile version