स्वयं पुनर्विकास योजनेला राज्य सरकारची मंजुरी

स्वयं पुनर्विकास योजनेला राज्य सरकारची मंजुरी

आमदार प्रवीण दरेकर

जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीत राहणाऱ्या लाखो मध्यमवर्गीय रहिवाशांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या स्वयं पुनर्विकास योजनेला अखेर राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मोठ्या कर सवलती, अधिकचा एफएसआय आणि पंतप्रधान आवास योजनेतील लाभ मिळवून देऊन स्वयं पुनर्विकास योजनेला वेगवान करण्याचा ऐतिहासिक निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. यासंबंधीचे पत्रक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रवीण दरेकर यांना दिले आहे. जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास मुंबई बँकेच्या सहकार्याने मार्गी लावण्यासाठी आमदार प्रवीण दरेकर यांनी ‘गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास अभियान’ सुरु केले. या अभियानाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले.

बिल्डर लॉबीचा बिमोड

बिल्डर लॉबीने पुनर्विकास योजना ताब्यात घेतली असून हजारो प्रकल्प अर्धवट सोडून दिल्याचे सत्य दाखवून दिले. त्यामुळे सोसायटीना मुंबई बँकेमार्फत आर्थिक साहाय्य देऊन स्वयं पुनर्विकासाची योजना आखली आहे. पण त्यासाठी सर्व परवानग्या एकत्र मिळणारी एक खिडकी योजना असावी, गृहनिर्माण संस्थांना कर सवलती, अधिक एफएसआय मिळावा. त्यातून राज्यभरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती द्यावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतरही या विषयाचा पाठपुरावा त्यांनी सरकारकडे केला होता.

आमदार प्रवीण दरेकर यांनी हा विषय लावून धरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण विभागाच्या अप्पर सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. स्वयं पुनर्विकास योजनेला कोणत्या सवलती द्यायच्या त्याचे निकष समिती ठरविणार होती. त्यामध्ये चार आयएएस अधिकाऱ्यांसोबत आमदार प्रवीण दरेकर यांनीही योगदान दिले होते. या समितीने स्वयं पुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांना अनेक सवलती, सुविधा, अधिक एफएसआय देण्याच्या शिफारसी करणारा अहवाल सरकारला दिला. यातील बहुतांशी सवलती सरकारने स्वीकारल्या आहेत. त्याचा अध्यादेश शासनाने जारी केला.

या आहेत शासनाच्या वतीने मिळणाऱ्या सवलती –

First Published on: September 15, 2019 4:26 PM
Exit mobile version