किशोर कुमार : रसिकांवर अधिराज्य गाजविणारा आवाज

किशोर कुमार : रसिकांवर अधिराज्य गाजविणारा आवाज

संगीत विश्वातील कायम लक्षात राहणारा आणि अजरामर असा आवाज म्हणजे किशोर कुमार. आज किशोर कुमार यांची पुण्यतिथी आहे. आपल्या आवाजाने आणि गाण्याने किशोर कुमार यांनी कायमच संगीत प्रेमींमध्ये एक वेगळाच आनंद दिला. किशोर कुमार यांनी वयाच्या एवढ्या 57 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. पण आजही त्यांचे चहाते कमी झालेले नाही. किशोर कुमार हे त्यांच्या गाण्यांमधून आणि चित्रपटांमधून आजही आपल्यात आहेत. किशोर कुमार एक उत्तम गायक तर होते पण त्या सोबतच ते एक उत्तम अभिनेते, चित्रपट निर्माते, पटकथा लेखक सुद्धा होते. किशोर कुमार यांनी चित्रपटात पदार्पण केलं असलं तरीही प्रेक्षकांना मात्र ते गायक म्हणूनच लक्षत राहिले. (Kishore Kumar 57 Death Anniversary)

किशोर कुमार यांना पार्श्वगायनासाठी 8 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे तर तर 80 हुन अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम सुद्धा केले आहे. किशोर कुमार यांचा आवाज म्हणेज त्यांची वेगळी ओळख बनला होता. किशोर कुमार यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक उत्तमोत्तम गाण्यांना स्वरसाज दिला. खंडवा येथे जन्मलेल्या किशोर कुमार यांच्या स्मरणार्थ मध्य प्रदेश सरकारने 1997 पासून ‘किशोर कुमार पुरस्कार’ सुरू केला आहे.

हे ही वाचा – अमिताभ बच्चन यांनी चित्रपटात साकारली ‘या’ अभिनेत्यांच्या वडिलांची भूमिका

‘हे’ आहे किशोर कुमार यांचं खरं नाव

किशोर कुमार यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 ला मध्य प्रदेशमधील खांडवा जिल्ह्यात झाला. किशोर कुमार यांचं खरं नाव आभास कुमार गांगुली असं होतं. पण, त्यांना खरी ओळख मिळाली ती, फक्त त्यांच्या किशोर कुमार या नावाने. किशोर कुमार आज आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी आणि त्यांची गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात कायम जिवंत आहेत.

‘ही’ आहेत किशोर कुमार यांची गाजलेली गाणी

1)

2)

3)

4)

5)

First Published on: October 13, 2022 10:14 AM
Exit mobile version