लालबाग गॅस दुर्घटना: मृतांची संख्या ५ वर

लालबाग गॅस दुर्घटना: मृतांची संख्या ५ वर

लालबाग गॅस दुर्घटना: मृतांची संख्या ५ वर

लालबाग,साराभाई इमारतीत गॅस सिलिंडर स्फोटात १६ जण जखमी झाले होते. त्यापैकी ५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर ३ जणांना बरे वाटल्याने घरी पाठवले आहे. मात्र केईएम आणि मसीना या दोन्ही रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकूण ८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लालबाग साराभाई इमारतीत राहणारे मंगेश राणे यांच्या घरात मुलीचे लग्नकार्य होते. ६ डिसेंबर रोजी हळदीचा कार्यक्रम होता. मात्र सकाळच्या सुमारास तेथील एका खोलीत गॅस गळती झाली. त्यामुळे झालेल्या भीषण स्फोटात १६ जण जखमी झाले होते. त्यापैकी गंभीर जखमी सुशीला बांगरे (६२) आणि करीम (४५) या काही तासातच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मंगेश राणे (६१) हे बेस्टमधील निवृत्त कर्मचारी होते. त्यांनी कॅटरर्सचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र या घटनेत राणे हेसुध्दा गंभीर जखमी झाले होते. आज सकाळी ९.५० वाजताच्या सुमारास केईएम रुग्णालयात उपचार घेताना मंगेश राणे यांचा आणि ज्ञानदेव सावंत (८५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या ४ झाली होती. केईएम रुग्णालयात उपचार घेत असलेले महेश मुणगे ( ५६) यांचाही उपचार सुरू असताना आज दुपारी १.४० वाजताच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता मृतांची संख्या ही ५ वर गेली आहे.

सध्या केईएम रुग्णालयात ४ जण तर मसीना रुग्णालयात ४ जण उपचार घेत असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. तर जखमींपैकी मिहिर चव्हाण (२०), प्रथमेश मुणगेकर (२७) या दोघांना ८ डिसेंबर रोजी बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले आहे. त्यानंतर ममता मुणगे (४८) यांनाही बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले आहे.


हेही वाचा – कालिदास कलामंदिराच्या भाडेतत्वात ५० टक्क्यांनी कपात

 

First Published on: December 11, 2020 5:49 PM
Exit mobile version