आरटीईचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

आरटीईचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

पहिली आणि पूर्व प्राथमिक वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी आरटीईच्या नियमानुसार खासगी शाळांत 25 टक्के प्रवेश मिळवण्यासाठी मुंबईत मोठी चुरस होणार आहे. या प्रवेशाठी मुंबईतील 367 शाळा आहेत. त्या शाळातील 7 हजार 202 जागा आहेत. या जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी तब्बल 14 हजारांहून अधिक अर्ज ऑनलाइन दाखल झाले आहेत.

प्रवेश प्रक्रिया यंदा 11 फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. या प्रवेशासाठी पालकांनी यंदा मोठा प्रतिसाद दिला आहे. मुंबईत यंदा जागा घटल्या आहेत. मात्र अर्ज करणार्‍या पालकांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहेत. 29 फेब्रुवारीला मुदत संपली होती. पालकांची मागणी लक्षात घेवून 4 मार्च पर्यंत मुदत वाढवली. या काळातही पालकांनी मोठ्या संख्येने अर्ज केले आहेत. त्यामुळे नामवंत शाळांसह अन्य शाळांतही प्रवेश मिळवण्यासाठी मोठी चुरस होण्याची शक्यता आहे. या प्रवेशाची 11 व 12 मार्च असे दोन दिवस लॉटरी काढण्याची प्रक्रिया चालणार असून ही लॉटरी एकदाच काढली जाणार आहे. त्यानंतर प्रतिक्षा यादीनुसार 3 टप्प्यांत प्रवेश दिले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

First Published on: March 4, 2020 2:36 AM
Exit mobile version