मलबारहिल परिसरात अवैद्य दारू साठा जप्त

मलबारहिल परिसरात अवैद्य दारू साठा जप्त

अवैद्य दारू साठा जप्त

मुंबई शहर जिल्ह्यात मलबार हिल परिसरात शनिवारी रात्री ७० हजार रूपयांचा अवैद्य दारू साठा जप्त करण्यात आला आहे. भारत जयराम वने (३३) असे या आरोपीचे नाव असून त्याला अटक करून कोर्टात हजर करण्यात आले आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सी.बी.राजपूत यांच्या मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

मुंबई शहर जिल्हा, राज्य उत्पादन शुल्क निरिक्षक गजानन राजूरकर, पोलीस अधिकारी विनय शिर्के, अविनाश धरत, जगदिश देशमुख, संताजी लाड यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला असता मलबार हिल परिसरात राहणारा भारत जयराम वने यांच्याकडे विदेशी मद्य, वाईन, बिअरचा साठा आढळून आला आहे. या दारु साठ्याची किंमत अंदाजे ७० हजार रुपये इतकी आहे. या आरोपीच्या विरूद्ध मुंबई दारू बंदीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


हेही वाचा – मुंबईतून १७ लाखांचा दारुसाठा जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई


 

First Published on: October 13, 2019 10:11 PM
Exit mobile version