घरमुंबईमुंबईतून १७ लाखांचा दारुसाठा जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

मुंबईतून १७ लाखांचा दारुसाठा जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Subscribe

निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून आचारसंहितेच्या काळात मुंबईत मोठ्याप्रमाणावर देशी आणि विदेशी दारुचा साठा जप्त केला करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून पोलिसांची करडी नजर आहे. अशातच निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची देखील कसून तपासणी करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज असतानाच आचारसंहितेच्या काळात मुंबईत मोठ्याप्रमाणावर देशी आणि विदेशी दारुचा साठा जप्त केला करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंत साडेसोळा लाखांचा अवैध दारुसाठा जप्त केला आहे.

उच्चभ्रू भागातही विदेशी विदेशी दारु जप्त

निवडणुकीच्या काळात विशेषत: झोपडपट्टी भागात मतदारांना दारुचे वाटप केले जाते. उच्चभ्रू भागातही विदेशी दारुचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशा प्रकारांमुळे निवडणुकीत व्यत्यय येऊ नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ११ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत १०७ ठिकाणी कारवाई केली. या कारावाईत १६ लाख ५५ हजार ३८१ रुपयांचा दारुचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. त्यात भारतीय बनावटीची ४२२ लिटर आणि विदेशी बनावटीची १८६ लिटर दारु ताब्यात घेण्यात आली आहे. उपनगरातील लोकसभा मतदारसंघांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तब्बल ५२ अधिकारी, १६ पोलीस निरीक्षक आणि ३२ दुय्यम निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

- Advertisement -

वाचा – पहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी पूर्ण; निवडणूक कर्मचारी रवाना



चार लाखांची विदेशी दारु जप्त

- Advertisement -

विदेशातील किंवा भारतातील विमानतळांवरुन पारपत्राच्या आधारे खरेदी केलेल्या विदेशी दारुची अवैध विक्री सुरु असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यावरुन चेंबूर येथे कारवाई करुन चार लाखांच्या १६ विदेशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.


 वाचा – मुंबईतल्या शिवाजीनगरमधून लाखोंचा दारुसाठा जप्त


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -