Live Updates: राज्यात २४ तासांत ५६ हजार २८६ आढळले नवे रुग्ण

Live Updates: राज्यात २४ तासांत ५६ हजार २८६ आढळले नवे रुग्ण
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक चढ-उतार पाहायला मिळत आहे. गुरुवारी राज्यात ५६ हजार २८६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. परंतु, शुक्रवारी पुन्हा हा आकडा वाढलेला दिसला. शुक्रवारी राज्यात ५८ हजार ९९३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तसेच ३०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
महाराष्ट्रात आज सायंकाळपासून वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दरम्यान कोणते निर्बंध लागू असणार? सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार का? खासगी वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय? याची गाईडलाईन्स राज्य सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत.

वीकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहणार?

गॅरेज सुरु राहणार आहेत. विकेंड लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. कोणीही व्यक्ती महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू शकणार नाही. तसंच, विकेंड लॉकडाऊनमध्ये एपीएमसी मार्केट सुरु राहणार आहे.
केंद्राने १ कोटी ६ लाखांच्यावर लसी दिल्या. पण राज्यातील कोरोना परिस्थिती भयानक आहे. त्यामुळे आम्ही राज्यपालांना विनंती केली. मुख्यमंत्री भांबावले आहेत. त्यामुळे राज्यपालांनी वाढीव लसी कसे मिळतील यासाठी हस्तक्षेप करावा अशी विनंती केली आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले.
सचिन वाझे याला मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणात २३ एप्रिल पर्यत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली
MPSC परीक्षा पुढे ढकलली मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय ११ एप्रिल रोजी होती एमपीएससी परीक्षा
जे.जे रुग्णालयात लसीचा तुटवडा, लस न मिळाल्याने नागरिक संतप्त, कोव्हिशिल्ड लसीचा तुटवडा
केंद्रीय आरोग्यमंत्री रामदास आठवलेंनी घेतली कोरोनाची लस
MPSC परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक व्हीसीद्वारे होणार बैठक, बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात राहणार उपस्थित MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता
ठाण्यातील घोडबंदर येथे इमारतीला भीषण आग, २० जण अडकल्याची शक्यता

जम्मूतील शोपिया सेक्टरमध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश

 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना फोन, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची केली मागणी

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीची मुंबईत ४ जागी छापेमारी

Mumbai NCB conducted raids in four locations across the city. Following the raid, four drug peddlers have been arrested in possession of drugs: NCB official

— ANI (@ANI) April 9, 2021
कोरोनाने चिंता वाढवली, देशात २४ तासात १ लाख ३१ हजार ९६८ कोरोनाबाधितांची नोंद
अजित पवारांच्या सभेतील गर्दीप्रकरणात आयोजक श्रीकांत शींदेवर गुन्हा दाखल
गोंदीया-थाटेझारी गावात लागलेल्या आगीत तीन मजुरांचा मृत्यू
बीकेसी लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांची गर्दी , बीकेसी लसीकरण केंद्रावर केवळ १६० लसी उपलब्ध, डॉक्टर, पोलिसांद्वारे नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न
अमेरिका-युरोपने लस निर्मितीचा कच्चा माल रोखला
दादर भाजी मार्केटमध्ये पुन्हा ग्राहकांची गर्दी, कोरोना नियम पायदळी
First Published on: April 9, 2021 9:00 PM
Exit mobile version