राज्य संचालक मंडळाच्या विरोधानंतरही एचडीआयएलला २,५०० कोटींचे कर्ज

राज्य संचालक मंडळाच्या विरोधानंतरही एचडीआयएलला २,५०० कोटींचे कर्ज

RBI ने PMC बँकेवरील निर्बंधांत केली वाढ, खातेधारकांवर होणार परिणाम

एचडीआयएल ग्रुपला नियमांचे उल्लंघन करुन २५०० कोटी रुपयांचे कर्ज दिल्यामुळे पंजाब आणि महाराष्ट्र बँक (पीएमसी बँक) अडचणीत आली असल्याची माहिती निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली. एचडीआयएल ग्रुपला मागच्या ६ ते ७ वर्षांपासून पीएमसी बँक नियमबाह्य पद्धतीने कर्ज देत होती. त्यानंतर दोन ते तीन वर्षांपासून एचडीआयएलने कर्जावरील परतावा देणे बंद केली.

मुंबई8एचडीआयएल ग्रुपला नियमांचे उल्लंघन करुन २५०० कोटी रुपयांचे कर्ज दिल्यामुळे पंजाब आणि महाराष्ट्र बँक (पीएमसी बँक) अडचणीत आली असल्याची माहिती निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली. एचडीआयएल ग्रुपला मागच्या ६ ते ७ वर्षांपासून पीएमसी बँक नियमबाह्य पद्धतीने कर्ज देत होती. त्यानंतर दोन ते तीन वर्षांपासून एचडीआयएलने कर्जावरील परतावा देणे बंद केली.

एचडीआयएलला दिलेल्या कर्जाला संचालक मंडळाची मंजुरी नव्हती. मात्र केंद्रीय कार्यालयातून कर्ज मंजूर होत होती, असेही थॉमस म्हणाले. पण या सर्व प्रकरणात दोषी कोण आहे? याबाबत जॉय थॉमस यांनी कोणताही खुलासा न देता उत्तर देणे टाळले.

बांधकाम क्षेत्रातील नामांकीत कंपनी एचडीआयएल ही सध्या दिवाळखोरीत गेली आहे. घेतलेले कर्ज परत न करु शकल्यामुळे पीएमसी बँकेला त्याचा फटका पडला. पीएमसी बँकेतील अनियमितता रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आल्यानंतर बँकेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधामुळे आम्ही आणखी अडचणीत आलो आहोत. हा विषय आम्ही बँकेतंर्गत सोडवता आला असता मात्र रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधामुळे आमच्या खातेदारांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून बँक बंद होणार असल्याची अफवा उडाली आहे. बँकेत कोणताही घोटाळा झाला नसून खातेदारांचे पैसे सुरक्षित असल्याचे जॉय थॉमस यांनी सांगितले.

जॉय थॉमस म्हणतात आरबीआयची चूक
मागच्या सहा ते सात वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने कर्ज देऊनही आरबीआयने आपल्या ऑडिटमध्ये ही चूक लक्षात का आणून दिली नाही, असा प्रश्न विचारल्यानंतर जॉय थॉमस म्हणाले की, आरबीआयच्याच ते ध्यानात आले नाही. एकंदर आरबीआय बँकेवर आपल्या चुकांचे खापर थॉमस यांनी फोडले. एचडीआयएल कंपनीला दिलेले २५०० कोटी एनपीए होऊनही पीएमसी बँकेने ऑगस्ट महिन्यात एचडीआयला पुन्हा ९६ कोटींचे वैयक्तिक कर्ज दिले होते. हे पैसे एचडीआयएलने बँक ऑफ इंडियाचे कर्ज फेडण्यासाठी वापरले, असल्याची माहिती समोर येत आहे.

First Published on: September 28, 2019 5:20 AM
Exit mobile version